Home /News /maharashtra /

Beed : तंत्रज्ञानाची जोड देऊन ‘हायटेक शेती’; पिकांवरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर

Beed : तंत्रज्ञानाची जोड देऊन ‘हायटेक शेती’; पिकांवरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर

पिकांवरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर

पिकांवरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर

केज तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी पिकांवर ड्रोनद्वारे कीटकनाशकांवर फवारणी केली आहे. हनुमंत काळदाते यांनी आपल्या 4 एकर शेतात ड्रोन फवारणीचा प्रयोग केला आहे.

    बीड, 25 जुलै : शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सध्या शेती (Agricultural) व्यवसायात अत्याधुनिक यंत्राच्या वापरावर भर दिला जात आहे. यामधूनच गेल्या काही दिवसांपासून (Drone Farming) ड्रोन शेतीचा पर्याय समोर येत आहे. अत्याधुनिक शेती पध्दतीने शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकच उत्पन्न शक्य आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ड्रोनच्या सहाय्याने शेतात कीटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा दोन्हीमध्ये बचत होत आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असतो. मात्र, आता जिल्ह्यातला शेतकरी हायटेक होऊ लागला आहे. केज तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी पिकांवर ड्रोनद्वारे कीटकनाशकांवर फवारणी केली आहे. हनुमंत काळदाते यांनी आपल्या 4 एकर शेतात ड्रोन फवारणीचा प्रयोग केला आहे. त्यांना या फवारणीसाठी अवघ्या 20 मिनिटांचा कालावधी लागला आहे. एसटीपी म्हणजे पाठीवर घेऊन इंधनावर चालणाऱ्या फवारा यंत्राने फवारणी करायची असेल तर चार एकरासाठी 2 तास वेळ लागतो. ड्रोनसाठी 500 मिली प्रति एकर औषधाचा वापर होता तर एसटीपीद्वारे 1000 मिली प्रति एकर औषध लागते. यावरून हे लक्षात येते की ड्रोनद्वारे फवारणी केली तर वेळ आणि औषधांची बचत होते. ड्रोनद्वारे शेतकरी 50% खर्च वाचवू  शकतात. शेतीसाठी हे तंत्रज्ञान नवीन असून आधुनिक पद्धतीने होत असलेली फवारणी पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती अशी माहिती शेतकरी हनुमंत काळदाते यांनी दिली. हेही वाचा- Beed : बसस्थानकाला खड्ड्यांचा विळखा; बस चालकांसह प्रवाशांची तारेवरची कसरत, पाहा VIDEO दिवसेंदिवस शेती कामांसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहेत. परिणामी मजूर दर देखील वाढला असल्याने शेतकऱ्यांना यंत्राद्वारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनेच शेती करावी लागत आहे. यात वेळ आणि पैशाचीही बचत होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सरसावले आहेत. काळे ऍग्रो सर्विसेस चिकुर्डा तालुका जिल्हा लातूर यांनी ही फवारणी केली असून यासाठी एका एकरासाठी 600 रुपये इतका खर्चही आकारला जात आहे.  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करता यावा यासाठी केज कृषी कार्यालयामार्फत काही कर्मचारी केरळला गेले होते. तिथे त्यांनी ड्रोन फवारणीचे तंत्रज्ञान समजून घेतले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कृषी विभागाद्वारे देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली. हेही वाचा- Akola : नाल्याच्या पाण्यासह घरात सापही शिरले, नागरिकांच्या त्रासात भर! पाहा VIDEO ड्रोन फवारणीचे फायदे ड्रोनद्वारे औषधी फवारणी केल्यामुळे पिकावर सारख्या प्रमाणात फवारणी होते. पिकाची अन्नसंचयन करण्याची कार्यक्षमता वाढते. वेळ आणि पैशाचीही बचत  होते. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती घेऊन ड्रोनद्वारे कीटकनाशकांवर फवारणी केली. ड्रोन फवारणीमुळे वेळ आणि पैशाची बचत होत असल्याचे शेतकरी हनुमंत काळदाते यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Beed, Beed news, Farmer, शेतकरी

    पुढील बातम्या