Home /News /maharashtra /

Beed heavy rain : बीडमध्ये मोठया पावसाने दाणादाण, चित्तथरारकपणे वाचवला एकाचा जीव viral video

Beed heavy rain : बीडमध्ये मोठया पावसाने दाणादाण, चित्तथरारकपणे वाचवला एकाचा जीव viral video

बीड (beed) शहरामध्ये सायंकाळी झालेल्या पावसाने अक्षरशः दाणादाण (Beed heavy rain) उडाली. शहरांतील मध्यवर्ती भागात पाणीच पाणी साचले आहे.

  बीड, 26 जून : बीड (beed) शहरामध्ये सायंकाळी झालेल्या पावसाने अक्षरशः दाणादाण (Beed heavy rain) उडाली. शहरांतील मध्यवर्ती भागातील जालना रोड, सुभाष रोड,पोलिस अधीक्षक निवासस्थान, सम्राट चौक, साठे चौक, सर्वत्र रस्त्यावर आणि नाल्याला पुराचे रूप आले होते. शहरातील गटारी तुंबल्या त्यामुळे पाणी थेट रस्त्यावर आलं. पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेकडून नालेसफाई आणि स्वच्छता याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने नाली आणि रस्ता एकच झाला त्यामुळे अनेक नाल्यामध्ये पडून अपघात घडले. रस्त्यावर पाणीच आले नाही तर काही दुकानात पाणी घुसल्याने काही क्षणांत दुकानदाराच होत्याच नव्हत झाल. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. (monsoon rain in beed)

  काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती दैव बलवत्तर म्हणून नागरिकांच्या सतर्कतेमुळे पूर्णपणे नालीत बुडालेल्या व्यक्तीला जीवदान मिळाले आहे. ही घटना बीड शहरातील सम्राट चौक भागांमध्ये घडली आहे. अक्षरशः रस्त्यावर पाणी असल्याने त्या पाण्यात कोण आहे ? हे देखील दिसत नव्हते मात्र रस्त्याच्या कडेला तरुण मंडळीनी पळत जाऊल पूर्णपणे बुडालेल्या व्यक्तीला काही तरुणांनी वाचवलं आहे.

  हे ही वाचा : सिल्व्हर ओकवरील बैठकीत आक्रमक रणनीती; एकनाथ शिंदे गटाचं संख्याबळ तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न?

  दरम्यान अवघ्या काही क्षणात वाकलेल्या तरुणांनी खाली बुडालेल्या व्यक्तीच्या बोटाला धरून त्याला वर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्यक्ती नालीत खोल पडल्याने अक्षरशः पाण्यात कोणी आहे का नाही ? हे देखील समजत नव्हतं. या दरम्यान इतरही काही तरुण मंडळींनी धावाधाव करत त्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढले आणि त्याला जीवनदान दिले.

  दरम्यान दोन तास पाऊस झाला आणि त्यानंतर रस्त्यावर अक्षरशः दोन फुटापर्यंत पाणी साचलं. यामुळे वाहतूक खोळंबली मात्र येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. केवळ 15 मिनिटांमध्ये तीन जण या नालीच्या पाण्यात पाडल्याची धक्कादायक माहिती स्थानिक तरुणाने दिलीय. आणि या दरम्यान या तिघाही जणांना या तरुणानेच वाचवले आहे. 

  हे ही वाचा : राज्यपाल इज बॅक, कोरोनावर मात करून कोश्यारी आजपासून राजभवनावर, राजकीय घडामोडींना येणार वेग

  दरम्यान बीडमध्ये दोन तास झालेल्या तुफान पावसाने, शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आलं होतं. यामुळे नागरिकांना रस्त्याची शोधाशोध करावी लागली. यामुळे बिडकारांमधून नगरपालिका विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून आता तरी नाले सफाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Beed, Beed news

  पुढील बातम्या