मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : बीडमध्ये गरब्याची जोरदार धूम, 50 वर्षांपासून आहे परंपरा

Video : बीडमध्ये गरब्याची जोरदार धूम, 50 वर्षांपासून आहे परंपरा

बीड शहरात स्थिरावलेला गुजराती समाज पारंपारिक पद्धतीने शहरातच उत्सव साजरा करतो. मागील 50 वर्षापासून विधीवत पूजा आणि रास गरबा खेळून हा उत्सव साजरा होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 28 सप्टेंबर : शारदीय नवरात्र उत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ झाला आहे. यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बीड शहरात स्थिरावलेला गुजराती समाज दरवर्षी पारंपारिक पद्धतीने शहरातच उत्सव साजरा करतो. मागील 50 वर्षापासून विधीवत पूजा आणि रास गरबा खेळून हा उत्सव साजरा होता.

शहरात व्यापार व व्यवसायाच्या निमित्ताने गुजराती समाज स्थिरावलेला आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात हा समाज त्यांच्या पारंपरिक पद्धतीने बीडमध्ये उत्सव साजरा करतो. यंदा या उत्सवाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष: नवरात्री हा उत्सव गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणे साजरी होतो. मात्र, हळहळू महाराष्ट्रात देखील हा उत्सव तेवढ्याच जोमाने साजरा होत  आहे.

स्व.अमृतलाल नरभेराम पहिले अध्यक्ष

बीडमधील गुजराती समाजाच्या या उत्सवाला 1971 दरम्यान धोंडीपुरा भागातील ठक्कर इमारतीत सुरुवात झाली. उत्सवाचे पहिले अध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व.अमृतलाल नरभेराम बुद्धदेव हे होते. कालांतराने शहर विस्तारले गेले. त्यामुळे मागील 17 वर्षापासून बीड शहरातील गुजराती कॉलनीतील श्री जलाराम मंदिरात देवीची स्थापना व नवरात्र उत्सव साजरी होत आहे. तेव्हापासूनच याच ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. 

Video : व्हीआयपी, लकी क्रमांक महागले, 'या' नंबरसाठी मोजावे लागतील 6 लाख

रात्री 8 ते 10 दांडिया

रात्री आठच्या सुमारास दांडिया आणि गरबा कार्यक्रमाला सुरुवात होते. रात्री 10 वाजेपर्यंत भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन देवीची आराधना केली जाते. रात्री 10 ते 11 दरम्यान महाआरती आणि महाप्रसाद दाखवला जातो.  दुर्गा अष्टमीच्या दिवशी मंत्र उच्चार करीत महायज्ञ करून पूर्ण आहुती दिली जाते. या दिवशी ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रमही पार पडतो.

Video : सौंदर्याचा खजिना 'कास पठार' फुलले, निसर्ग वाचवण्यासाठी पहिल्यांदाच खास उपाय

पारंपारिक पोशाख

दरम्यान, सर्व महिला, मुले, मुली एकत्र येत रास गरबा खेळतात. यावेळी गुजराती पारंपरिक वेषभूषा देखील केली जाते. उत्सवाच्या नऊ दिवसात वेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी पारंपारिक पोशाख परिधान केले जातात. 

First published:

Tags: Beed, Beed news