मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जेसीबीमधून पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, धनुभाऊचं ओकेच वेलकम, VIDEO

जेसीबीमधून पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, धनुभाऊचं ओकेच वेलकम, VIDEO

जे प्रेम कधीच मिळाला नाही ते आता अपघातातून वाचल्यावर मिळालं. प्रत्येकाने माझं जीवन पाहिलं.

जे प्रेम कधीच मिळाला नाही ते आता अपघातातून वाचल्यावर मिळालं. प्रत्येकाने माझं जीवन पाहिलं.

जे प्रेम कधीच मिळाला नाही ते आता अपघातातून वाचल्यावर मिळालं. प्रत्येकाने माझं जीवन पाहिलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 13 फेब्रुवारी : 'तुमच्या मनात जो पर्यंत आहे तो पर्यंत शरीरात श्वास राहील. माझा जीव तुमच्यात आहे. लाख वेळा जीव देण्याची वेळ आली तरी देईल, पण परळीला विचारल्या शिवाय राजकारणातली कुठलीच घडामोड घडणार नाही' असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे परळीत भावुक झाले.

अपघातातून बचावल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे परळीमध्ये आले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केलं. भले मोठे हार, जेसीबीने पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये धनुदादांचं स्वागत करण्यात आलं.

या स्वागतच काय वर्णन करू, शब्द कमी पडतात. जे प्रेम कधीच मिळाला नाही ते आता अपघातातून वाचल्यावर मिळालं. प्रत्येकाने माझं जीवन पाहिलं. राजकीय, सामजिक काम पाहिले कुठली महत्वकांतक्षा ठेवली नाही. फक्त मातीशी इमान राखला. तुमच्या मनात जो पर्यंत आहे तो पर्यंत शरीरात श्वास राहील. माझा जीव तुमच्यात आहे. लाख वेळा जीव देण्याची वेळ आली तरी देईल, पण परळीला विचारल्या शिवाय राजकारणातली कुठलीच घडामोड घडणार नाही. 2009 पासून संकट होती मात्र माझ्या सहकाऱ्यांमुळे जिवंत आहे. कायम तुमच्या सेवेत राहील. मोडेन पण कुणासमोर वाकणार नाही. ही संकट आले व्यक्तिगत आरोप झाले, कुटुंबावर आरोप झाले, पवार साहेबांनी आणि अजितदादांनी ताकद दिली, म्हणून आज तुमच्यासमोर ऊभा आहे, असं म्हणत धनंजय मुंडे भारावून गेले.

(शिंदे सरकारचं उद्या ब्रेकअप होणार की टिकणार? सुप्रीम कोर्टाचं ठरलं! आली मोठी बातमी)

'हॉस्पिटल अणि घराचा कंटाळा आला जिवात जीव येण्याठी मी परळीत आलोय. आराम करायला आलोय. या अपघातात बरगड्या मोडल्या. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गेलो तर , एखादी बरगडी का मोडू न आला नाहीस असं का म्हण्याचे. काहीच करता येतं नाही बोलता येत नाही, हालता येत नाहीं. सगळ्याला सांगितल हे काही करू नका. बरगड्यावर भागलं, असंही धनंजय मुंडें म्हणाले.

बंद पडलेला कारखाना जुना कारखाना भाड्याने घेतला भाव 2 हजार दिला. इथं मात्र जवळचे कारखाने बंद पाडून नोटिसा लागायला लागल्या, असं म्हणत धनंजय मुंडे यंनी पंकजा मुंडेंचं नावं न घेता टोला लगावला.

'हा दिवस माझ्यासाठी आजचा दिवस पुनर्जन्म दिलाय तो या मातीतल्या माणसाची सेवा करण्यासाठी. निवडणूक, मंत्रिपद स्वागत, त्यात सार्थ असतो पण फक्त आमदार असताना, भले आमदार, मंत्री नसलो तरी मी तुमच्यात असावा, हे प्रेम आहे. खरं तर मी आपल्याच परळीतील तिघांचा अपघात झाला, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

धनंजय मुंडेंना तुम्ही ताकद दिली. तुमचे आशीर्वाद आहेत. तीन वर्षात दोनदा कोविड, एका वर्षात किती संकटे यावी. तीन वर्षांच्या काळात मेंदूचा अटॅक अणि पुन्हा हा अपघात यातून सुखरूप आहे ही तुमची आशीर्वाद आहेत. कुच लोग मेरे बारे में बोल रहे, मैने कभी पिछे से वार नही किये लढेंगे तो सामने...वक्त ने थोडासा साथ नाही दिया तो लोगो नें मेरी काबिलियत पर शक कर दिया, अशी शायरी म्हणत धनंजय मुंडेंनी टोला लगावला.

एवढी संकट आली पणं विकासाची कुठली कामे थाबू दिली नाही. 19 मध्ये विकासचं स्वप्न पूर्ण केलं 70%कामे झाली. रस्ते. माझं स्वप्न एमआयडीसीचे दुप्पट उत्पन्न करण्याचे ते काम केले. पण एक नक्की सांगतो तलाव, सगळे तलाव मंजूर आहेत. 13 तलावाने कोरडवाहू जमिन ओलिताखाली येईल. चार हजार विहिरी दिल्या.. सामान्य माणसासाठी संघर्ष, जो पर्यंत आमदार असेल नसेल पण काम सुरूच राहिल, अशी ग्वाही मुंडेंनी दिली.

First published:
top videos