बीड, 02 जानेवारी : सरकारी रुग्णालयात चांगला उपचार होत नाही, असा समज अनेक नागरिकांचा असतो. मात्र, आता सरकारी रुग्णालय आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं चांगले उपचार होत आहेत. नागरिक देखील याचा फायदा घेत आहेत. मागील आठ महिन्यात बीड जिल्ह्यामध्ये 5400 मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडल्या असून राज्यातील जिल्हानिहाय शस्त्रक्रियेत हा क्रमांक अव्वल आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अंधूक दिसणाऱ्या ज्येष्ठांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यामध्ये जिल्ह्यातील सहा ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्याला शस्त्रक्रिया करण्यासाठी एक वार्षिक उद्दिष्ट दिलेले असते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट बीड जिल्ह्याने पूर्ण केले असून राज्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे. यामुळे शासकीय सेवेत काम करणाऱ्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी देखील नाव कमावले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये वृद्धांना दृष्टी देण्याचे काम जिल्ह्यामधील विविध सरकारी रुग्णालयाने केले आहे. यामध्ये बीड, लोखंडी सावरगाव. गेवराई. केज. आणि परळी. येथील सरकारी रुग्णालयांनी मागील आठ महिन्यात 5400 मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. आरोग्य विभागाने जिल्ह्याला 6041 शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यामध्ये जिल्ह्याने अव्वल क्रमांक मिळवला आहे.
काय आहे मोतीबिंदू आजार
मोतीबिंदू हा आजार अधिकतर वयोमानानुसार होतो. क्वचित याचे कारण डोळ्याची जळजळ, डोळ्यांना झालेली जखम, इन्फेक्शन हे असते, मधुमेहाच्या रुग्णांना हा आजार कमी वयात होऊ शकतो. यावर वेळीच उपचार न झाल्यास आंधळेपण देखील येऊ शकतो. ऑपरेशन करून मोतीबिंदू काढल्यास आपण आपली दृष्टी परत मिळू शकतो.
आरोग्य जनजागृतीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचं मिशन, 4 हजार किलोमीटर करणार यात्रा
मोतीबिंदू होण्याचे कारणं
वयाच्या साठ वर्षांनंतर मोतीबिंदू होण्याचे अधिक शक्यता असते. मात्र हल्लीच्या काळामध्ये पन्नासाच्या आत देखील मोतीबिंदू होऊ लागला आहे. आयड्रॉपचा अतिरिक्त वापर, डोळ्यांना मार, दीर्घ काळापासून मधुमेह ही मोतीबिंदूची प्रमुख कारणे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.