Home /News /maharashtra /

Beed : बीड शहरात घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती; "दोन दिवसांपासून घंटा गाड्याही बंद"

Beed : बीड शहरात घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती; "दोन दिवसांपासून घंटा गाड्याही बंद"

रोगराई

रोगराई वाढू शकते या घाणीच्या विळख्यात मुळे

पावसाळा सुरू होण्याआधीच बीड शहरात नगरपरिषदेने 'स्वच्छ भारत...स्वच्छ शहर' म्हणत स्वच्छता मोहिमेला सुरुवात तर केली पण शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुढे वाचा ...
    बीड, 25 जून: 'स्वच्छ भारत, स्वच्छ शहर'चा (Clean India, clean city) नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. परंतु, शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे (Piles of garbage) दिसतात. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साचलेल्या या कचऱ्यामुळे डेंगू, हिवताप, मलेरिया यांसारख्या साथीचे आजार (Epidemic) पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.  पावसाळा सुरू होण्याआधीच बीड शहरात नगरपरिषदेने 'स्वच्छ भारत...स्वच्छ शहर' म्हणत स्वच्छता मोहिमेला सुरुवात तर केली पण शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य तसचे पावसाळ्याच्या तोंडावर डेंगू, हिवताप, मलेरिया यांसारख्या साथीचे आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केला जात आहे. स्टेडियम रोड आणि कॉम्प्लेक्स परिसरात कचऱ्याचे ढीग पावसाळ्या आधीच मे महिन्यात शहर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेची मोठी यंत्रणा कामाला लागली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता नक्की स्वच्छतेचे काय काम झाले? असाचा प्रश्न निर्माण होत आहे. बीड शहरातील स्टेडीएममध्ये सकाळी व्यायाम करण्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या संखेने येतात. मात्र येथील परिसरात देखील ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसत आहेत. स्टेडियम रोड आणि कॉम्प्लेक्स परिसरात अनेक कॉफी शॉप, हॉटेल आहेत. हाॅटेलातील युज अँड थ्रो ग्लास, खराब झालेले अन्न, प्लास्टिक पिशव्या, बाॅटल्स, एक्सपायर झालेल्या विविध वस्तू या कचऱ्यात आढळतात. व्यायाम करुन निरोगी राहण्यासाठी येणाऱ्या शहरातील नागरिकांना येथील परिसरातील घान पाहता येथूनच आरोग्याचा धोका होईल अशी भिती आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देवून स्वच्छता मोहिम हाती घेण्याची मागणी येथे व्यायामासाठी येणारे नागरिक करीत आहेत.  वाचा : Shocking! आकाशातून थेट जमिनीवरील कारवर कोसळलं विमान; भयंकर अपघाताचा VIDEO VIRAL मंदिर परिसरात दुर्गंधी बीड शहरातील जिल्हा परिषद आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात देखील कचर्‍याने विळखा घातला आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. तसेच परिसरात अनेक शासकीय निवासस्थान देखील आहेत. मात्र, येथील स्वच्छतेकडे देखील प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. बीड शहरापासून जवळच कंकालेश्वर हे इतिहासकालीन मंदिर आहे. मंदिराच्या चारी बाजूला जलकुंड आहे. या जलकुंडात नागरिकांनी कचरा टाकल्याने मंदिर परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहराला लाभलेले असे ऐतिहासिक मंदिर देखील दुर्गंधीच्या विळख्यात असल्याने भाविक संताप व्यक्त करत आहेत. "दोन दिवसांपासून घंटा गाड्या बंद" शहरातील कचऱ्याबाबत नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश ढाकणे यांनी सांगितले की, शहरातील कचरा वाहून नेणाऱ्या घंटा गाड्या दोन दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे शहरात कचरा पाहावयास मिळत आहे. मात्र, लवकरात लवकर यावर उपाय योजन  करुन शहर स्वच्छ केले जाईल. नागरिकांनी देखील ठरवून दिलेल्या कचरा कुंडीत कचरा टाकावा रस्त्याच्या कडेला किंवा नालीत कचरा टाकू नये, असे आवाहन ढाकणे यांनी केले.  वाचा : raju shetti : ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतले, प्रोत्साहन अनुदानासाठी जाचक अटी, राजू शेट्टींची खरमरीत टीका "साठलेल्या कचऱ्यामुळे आरोग्यास धोका"  पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी पाणी साठते. नाल्या तुंबतात. साठलेल्या कचऱ्यात वेगवेगळे जंतू तयार होतात यामुळे डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया, डेंगू, यासारखे आजार होण्याची शक्यता असल्याची माहिती, बीड येथील डॉक्टर अनिल बारकुल यांनी दिली. 
    First published:

    Tags: Beed, Beed news

    पुढील बातम्या