Home /News /maharashtra /

Beed Crime : बीडमध्ये भर चौकात गँगवार, शुल्लक वादातून धारदार शस्त्राचा वापर घटना CCTVमध्ये कैद

Beed Crime : बीडमध्ये भर चौकात गँगवार, शुल्लक वादातून धारदार शस्त्राचा वापर घटना CCTVमध्ये कैद

बीडमध्ये झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

  बीड, 03 ऑगस्ट : बीड शहरातील तुळजाई चौकात भर रस्त्यात युवकांमध्ये गँगवारची घटना पुन्हा समोर आली आहे. या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या वादामध्ये धारदार शास्त्राने एका तरुणावर 8 तरुणांनी हल्ला केला. कुणाल ढोले अस जखमी तरुणाच नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Beed Crime)

  या गँगवार मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कायदा सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांचा धाक उरला आहे का? नाही असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

  हे ही वाचा : उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य, शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

  पंधरा दिवसांपूर्वी अशाच वादांमधून खंडेश्वरी परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच तुळजाई चौकामध्ये घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा तरुणाई मधील गँगवारचां प्रश्न समोर आला आहे.

  शुल्लक कारणावरून एकमेकांना भिडणारे युवकांमध्ये धारदार शस्त्राने गँगवार करू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या वादासाठी कुठलं कारण समोर येईल हे सांगता येत नाही कॉलेजच्या समोर फिरणारे ढोलकी तसेच गल्लीबोळामध्ये टपरीवर उभा राहिलेली मुलं यांच्यामध्ये गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढत असल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यामुळे तातडीने या गॅंगवॉरचां बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

  हे ही वाचा : संजय राऊत झाले आता शरद पवार आणि अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी

  बीडमध्ये खूनाचा गुन्हा दाखल

  दरम्यान बीड तालुक्यातील नरसिंह तांडा येथील एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. अंजना सुनिल राठोड असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी तिचा खून झाल्याचा आरोप केला असून सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

  सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी आणलेल्या उमापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. माहिती मिळताच उमापूर येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Beed, Beed news, Crime, Crime news

  पुढील बातम्या