Home /News /maharashtra /

Beed : ब्रह्मदेवाने स्थापन केलेल्या गणपती मंदिराबद्दल माहितीये का?; ‘नवगण राजुरी’त तब्बल नऊ गणेशांचे अधिष्ठान, पाहा VIDEO

Beed : ब्रह्मदेवाने स्थापन केलेल्या गणपती मंदिराबद्दल माहितीये का?; ‘नवगण राजुरी’त तब्बल नऊ गणेशांचे अधिष्ठान, पाहा VIDEO

title=

राज्यात अनेक देवदवतांचे मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराला एक वेगळे धार्मिक महत्त्व आहे. बीड शहराजवळील नवगणराजुरी गावातील चतुर्मुख गणपतीचेही वेगळे धार्मिक महत्त्व आहे. मंदिराच्या चार दिशेला चार गणेश मूर्ती एकाच ठिकाणी एका दगडावर आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चार दिशेला चार गणपतीची रुपे एकाच शिळेवर आहेत.

पुढे वाचा ...
  बीड, 8 जुलै : महाराष्ट्रात श्रीगणेशाची अष्टविनायक रूपे प्रसिद्ध आहेत. मात्र, बीड जिल्ह्यामधील नवगण राजुरी हे गाव नऊ गणपतींसाठी  (Navgan Ganesh Mandir) प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात दुर्मिळ अशी चार मुख असलेल्या गणपतीची मूर्ती नवगण राजुरी इथं आहे. समोर महामंगलेश्वर, मागच्या बाजूला शेषाद्रीदिष्टीत, उजव्या बाजूला मयुरेश्वर आणि डाव्याबाजूला उत्तिष्ठ गणपती आहे. या गणेशाच्या भव्य मूर्ती पुढे एक लहान आकाराची गणेश मूर्ती आहे. मंदिरात पाच व गावाच्या चार वेशीवर चार गणपती आहेत. त्यामुळे या स्थानाला नवगण राजुरी (Navgan Rajuri) म्हणतात. ब्रह्मदेवाने स्वतःच्या या नवगणांची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. राज्यात अनेक देवदवतांचे मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराला एक वेगळे धार्मिक महत्त्व आहे. बीड शहराजवळील नवगणराजुरी गावातील चतुर्मुख गणपतीचेही वेगळे धार्मिक महत्त्व आहे. मंदिराच्या चार दिशेला चार गणेश मूर्ती एकाच ठिकाणी एका दगडावर आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चार दिशेला चार गणपतीची रुपे एकाच शिळेवर आहेत. पूर्वेकडे मुख असलेला महामंगलेश्वर, पश्चिमाभिमुख शेषाद्रीदिष्टीत, दक्षिणाभिमुख मयूरेश्वर आणि उत्तराभिमुख उत्तिष्ठ असे चार गणपती आहेत. या गणेशाच्या भव्य मूर्ती पुढे एक लहान आकाराची गणेश मूर्ती देखील असून तिचीही पूजा केली जाते. वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO ब्रह्मदेवाने स्वतःच्या हस्ते केली गणेशाची स्थापना नवगण राजुरी या गावाला मोठा धार्मिक महत्त्व असून या ठिकाणी ब्रह्मदेवाने स्वतःच्या हस्ते गणेशाची स्थापना केल्याचे पुराणात उल्लेख आढळतो. गावालगत सीमेवर चारही दिशांना चार गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली असून गावातील मुख्य मंदिरात पाच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरात पाच व गावाच्या चार वेशीवर चार गणपती आहेत. त्यामुळे या स्थानाला नवगण राजुरी म्हणतात. नवगण येथे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने आराधना केल्याचे जाणकार सांगतात. ऋषींनी उपासनेसाठी गंगेच्या पाण्याने गणेशाला अभिषेक केला तेव्हापासून आजही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गंगेचे पाणी कावडीने आणून गणेशाला स्नान घातले जाते. चतुर्थीपर्यंत दररोज गावाच्या सीमेवरील मूर्तीची पूजा, नैवेद्य, आरती केली जाते. त्याला द्वार पूजा असे देखील म्हटले जाते, अशी माहिती अमृताश्रम स्वामी दिली. पूर्वी हा प्रदेश दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा प्राचीन काळापासून राजुरी हे नऊ गणेशाचे पीठ आहे. अनेक ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने व प्रत्यक्षात ब्रह्मदेवाच्या तपाने ही भूमी सिद्ध झाली आहे. पूर्वी हा प्रदेश दंडकारण्य म्हणून ओळखला जात असे. येथे दंडक नावाचा राजा राज्य करत होता. प्रत्यक्षात ब्रह्मदेवाने स्वतः तप करण्यासाठी भगवान विष्णूकडे ही भूमी मागून घेतली होती. वाचा- Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO
   उलटी छत्री पकडून काल्याचा प्रसाद
  माघी गणेशोत्सव येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येतो.मंदिरात सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गणेश कथेचे पारायण, भजन केले जाते. उलटी छत्री पकडून काल्याचा प्रसाद घेण्याची येथे धार्मिक परंपरा आहे. रथसप्तमीच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. उत्सवाला राज्यभरातून अनेक भाविक भक्त आवर्जून येत असतात. मंदिरापर्यंत पोहोचायचे कसे बीड शहरापासून 15 किलोमीटरच्या अंतरावर नवगण राजुरी गावात हे मंदिर आहे. गावात येतात मंगलमूर्ती गणपतीचे मंदिर दिसते. मंदिरात शिंदे गुरव (8805897424) हे पुजारी असतात. Navgan Rajuri गुगल मॅपवरून साभार मंदिराची दिनचर्या सकाळी 4 वाजायच्या सुमारास मंदिर भाविक भक्तांसाठी खुले केले जाते. सकाळी आरती पूजा नैवेद्य आणि संध्याकाळी आरती होते. रात्री आठच्या सुमारास मंदिर बंद करण्यात येते.
  First published:

  Tags: Beed, Beed news, Famous temples, Ganesh chaturthi, Temple

  पुढील बातम्या