मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बीडमध्ये तरंगत्या रंगमंचावर झाला भरतनाट्यमचा कार्यक्रम! राज्यातील पहिल्याच प्रयोगाचा पाहा Video

बीडमध्ये तरंगत्या रंगमंचावर झाला भरतनाट्यमचा कार्यक्रम! राज्यातील पहिल्याच प्रयोगाचा पाहा Video

X
Beed

Beed News : बीडमध्ये तरंगत्या रंगमंचावर नृत्य सादर करण्यात आलं. या प्रकारे नृत्य सादर करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

Beed News : बीडमध्ये तरंगत्या रंगमंचावर नृत्य सादर करण्यात आलं. या प्रकारे नृत्य सादर करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी

    बीड, 23 मार्च :  राज्यातील अनेक गावांमध्ये आजही कला आणि सांस्कृतिक ठेवा जतन करणारे व्यक्ती आणि संस्था आहेत. त्यांच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम केले जात असतात. बीडमध्ये  तरंगत्या रंगमंचावर  नृत्य सादर करण्यात आलं. या प्रकारे नृत्य सादर करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

    काय आहे वैशिष्ट्य?

    बीडमधील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिराच्या परिसरात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 26 वर्षांपासून हा महोत्सव मोठ्या थाटात पार पडतो. याच महोत्सवात गेल्या दहा वर्षांपासून नृत्य तसंच विविध कला सादर केल्या जातात. या प्रकारचा हा राज्यातील एकमेव तरंगता मंच आहे.

    450 वर्ष जुनं अमृतेश्वर मंदिर! शिवाजी महाराजांशी आहे कनेक्शन, पाहा Video

    कशी झाली सुरूवात?

    फिरत्या रंगमंचावरही हे नृत्य पाहण्यासाठी बीडकरांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांचं ग्रामदैवताचं दर्शन व्हावं, त्याची उपासना करत असताना काही तरी वेगळं केलं पाहिजे असा विचार करुन आमच्या मनात तरंगत्या मंचाची कल्पना आली. त्यावेळी अनेकांनी हा मंच तयार करताना धोका असल्याचं सांगितलं. त्यावेळी आम्ही हा मंच तयार केला. त्यावर दहा जणांना उभं केलं. त्यांनी त्यावर नृत्य केलं आणि त्यानंतर यामध्ये कोणताही धोका नसल्याचं सिद्ध झालं. आजही कोणतीही आपतकालीन परिस्थिती निर्माण झाली तर मदत करण्यासाठी आमचे स्वयंसेवक कार्यक्रमाच्या दरम्यान तयार असतात, असं या कार्यक्रमाचे आयोजक भरत लोळगे यांनी सांगितलं.

    या नृत्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील माता निर्मला देवी नृत्य संस्कार नृत्य संगीत अकादमीच्या कलाकारांनी भरतनाट्यम नृत्य सादर केले. त्यांच्यासाठी हा विशेष अनुभव होता. रंगमंच हलत असल्यानं  नृत्य सादर करताना पहिल्यांदा भीती वाटली पण, हळहळू ती भीती कमी झाली. प्रेक्षकांनीही आम्हाला दाद दिल्यानं आमचा उत्साह आणखी वाढला, अशी प्रतिक्रिया हर्षदा रुणवाळ यांनी व्यक्त केली. हर्षदा यांच्यासह आदिती ढाळे आणि नेहा कुलकर्णी यांनी यावेळी त्यांची कला सादर केली. या कार्यक्रमात भरतनाट्यमसह भारूड, महाराष्ट्राचे गौरव गीत आणि मराठवाडा गौरव गीतही सादर झाले.

    First published:
    top videos

      Tags: Beed, Dance video, Local18