बीड, 06 जानेवारी : मोठमोठ्या शहरांमध्ये काही वर्षांपूर्वीच फूड पॅटर्न बदला आहे. काहींना व्हेज आवडते तर काहींना नॉनव्हेज. यातच शहरांमधला बदलता फूड पॅटर्न आता बीड जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये देखील पोहोचला आहे. पूर्वी शहरांमध्ये मिळणारे बर्गर, पिझ्झा आणि सँडविच आता गाव खेड्यामध्ये देखील मिळू लागले आहे.
बीड सारख्या ग्रामीण भागामध्ये दोन वर्षांपूर्वी फास्ट फूडमध्ये भेळ, पाणीपुरी, वडापाव, दाबेली असे अनेक पदार्थ खवय्यांना खावेसे वाटत होते. मात्र, आता हळूहळू होत असणारे खाद्य पदार्थांमधील बदल बीडमध्ये देखील दिसून येत आहेत. बीडमध्ये नवनवीन फास्ट फूड व्यवसाय सुरू झाल्याने नागरिकांचा देखील त्यालाच प्रतिसाद मिळत आहे.
बीडमध्ये आज असे अनेक ठिकाण आहेत ज्या ठिकाणी पिझ्झा, बर्गर, मोमोज आणि सँडविच खाण्यासाठी खवय्ये संध्याकाळच्या सुमारास गर्दी करत आहेत. ज्या दरात पावभाजी, पाणीपुरी आणि भेळ मिळते त्याच दारात पिझ्झा, सँडविच, बर्गर खाद्यपदार्थ खावयास उपलब्ध झाले आहेत.
वडापावच्या दरात सँडविच
बीड शहरातील पाटील खाऊ गल्लीत वडापावच्या दरात सँडविच विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या वडापावची चव चाखण्यापेक्षा अनेक विद्यार्थी सँडविचची चव चाखून बघत आहेत. त्यांना ती चव आवडत देखील आहे. फक्त 49 रुपयांमध्ये पनीर पिझ्झा मिळत असल्यामुळे खवय्यांनी त्यांचा मोर्चा सध्यातरी बर्गर आणि पिझ्झाकडे वळवला आहे.
स्पायडरमॅन, छोटा भीम ते पुष्पा!, आकर्षक पतंगाने सजलाय बाजार, Video
शहरांमध्ये सुरू झालेले कॉफी शॉपमध्ये देखील अगदी कमी दरामध्ये पोट्याटो स्प्रिंग, पनीर आलू पराठा, छोले भटूरे, पनीर मखनी, सँडविच यासारखे जंक फूड बीडमध्ये उपलब्ध झाले आहेत. मोठ्या शहरात महागड्या दरात मिळणारे पदार्थ ग्रामीण भागत कमी किमतीत उपलब्ध झाल्याने खवय्ये या नवनवीन पदार्थाकडे आकर्षित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Local Food, Local18