Home /News /maharashtra /

Beed : इंदोरी पोह्याच्या तोडीस बीडमधील आप्पांचे पोहे, पाहा VIDEO

Beed : इंदोरी पोह्याच्या तोडीस बीडमधील आप्पांचे पोहे, पाहा VIDEO

title=

कामगारांपासून ते नोकरदारांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वजण आप्पाचे पोहे खाण्यासाठी येतात. इथल्या चविष्ट पोह्याची प्लेट खायला खवय्यांची नेहमीच रीघ दिसून येते.

    बीड, 06 ऑगस्ट : पोह्याने देशात नाष्टा म्हणून जे स्थान घेतले आहे, ते कदाचित दुसरा नाष्टा घेणार नाही. खाद्यपदार्थाच्या स्वरूपानुसार, बहुतेक लोक नाष्ट्यात हलके अन्न खाण्यास प्राधान्य देतात. पोहे हे हलक्या नाष्ट्याचे उत्तम उदाहरण आहे. अशात जर कुठे उत्तम आणि स्वादिष्ट पोहे मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण नक्कीच जातो. पोह्याचा उल्लेख आला तर आपोआप इंदौरचे नाव आठवेल. पण इंदोरी पोहे तसे प्रसिद्ध असले तरी त्याच्या तोडीस बीडमधील अप्पाचे पोहे आहेत (Appa's Famous kadi Poha), याच पोह्याबद्दलचा हा खास रिपोर्ट. बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात आप्पा पोहे सेंटर मागील पंधरा वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. सुरुवातीला राजेंद्र सपाटे यांनी या पोहे विक्रीला एका फिरता गाडा घेऊन सुरुवात केली. सुरुवातील अगदी पाच रुपयांत पोह्याची प्लेट मिळायची. आता ही प्लेट वीस रुपयापर्यंत पोहोचली आहे. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO खवय्यांची नेहमीच रीघ सकाळी साडे सातच्या सुमारास पाच बाय सात पत्र्याच्या शेडमध्ये पोहे बनवायची लगबग सुरू होते. आप्पा आणि त्यांचे दोन मुलं गेल्या अनेक वर्षांपासून येथे पोहे बनवतात. दररोज या ठिकाणी 15 किलो पोहे बनवले जातात. कामगारांपासून ते नोकरदारांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वजण आप्पाचे पोहे खाण्यासाठी येतात. इथल्या चविष्ट पोह्याची प्लेट खायला खवय्यांची नेहमीच रीघ दिसून येते. प्लेटमध्ये गरम-गरम पोहे, कांदा आणि सोबत कढीपत्ता टाकलेली चवदार पांढरी कडी यासह लसूण शेवने सजवलेली प्लेट पाहताच तोंडाला पाणी सुटते. मग ही पोह्याची प्लेट समोर आली की ग्राहक ताव मारायला सुरुवात करतात. अप्पांच्या या हॉटेलला आता पंधरा वर्षे पूर्ण झाले आहेत. आप्पाचे स्वप्न आहे की, आपलं हॉटेल आलिशान बनावं. पण ज्या जागेवर अप्पाचं पोह्यामुळे नाव झालं ती जागा अप्पांना सोडायची नाही. अडचण आहे ती हॉटेल उभारण्यासाठी जागेची. जास्तीची जागा मिळत नसल्याने आजही आप्पा पाच बाय सातच्या शेडमध्ये आपला व्यवसाय चालवत आहेत. हेही वाचा- उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी पोह्याची चव कधी कमी होऊ दिली नाही आपल्या व्यवसायाबद्दल बोलताना राजेंद्र सपाटे (संपर्क क्रमांक- 9730486030) म्हणजेच आप्पा असे सांगतात की, मागील पंधरा वर्षांपूर्वी फिरत्या गाड्यावर पोहे विक्री सुरू केली. स्वप्नातही वाटलं नव्हतं हा व्यवसाय एवढ्या लोकांपर्यंत पोहोचेल. आज पोह्याबरोबर इतर पदार्थ देखील  हॉटेलात विक्रीसाठी आहेत. पण पोह्याला अधिक मागणी आहे. पोह्याची चव कधी कमी होऊ दिली नाही. ती टिकून ठेवली. यामुळेच खवय्यांचा एवढा प्रतिसाद मिळत आहे. तुम्हालाही या चवदार पोह्याची चव चाखायची असेल तर बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात आप्पा पोहे सेंटर नक्कीच भेट द्या.
    First published:

    Tags: Beed, Beed news, Food, बीडकर

    पुढील बातम्या