मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बीडमधील पती-पत्नीने कर्ज सल्लागारालाच गंडवलं; जाळ्यात ओढत साडेअठरा लाखाची फसवणूक

बीडमधील पती-पत्नीने कर्ज सल्लागारालाच गंडवलं; जाळ्यात ओढत साडेअठरा लाखाची फसवणूक

पती-पत्नीने या सल्लागाराला तब्बल साडेअठरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची बाब उघडकीस आली आहे. ही घटना बीडच्या अंबाजोगाई शहरात घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड 24 नोव्हेंबर : राज्यात गुन्हेगारी आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता बीडमधून फसवणुकीची आणखी एक घटना समोर आली आहे. यात चक्क कर्ज सल्लागाराचीच अधिक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. पती-पत्नीने या सल्लागाराला तब्बल साडेअठरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची बाब उघडकीस आली आहे. ही घटना बीडच्या अंबाजोगाई शहरात घडली.

पुणेकर पोराने जीव दिला, राजस्थानमध्ये मारेकरी सापडला, अख्ख गावच करतंय सेक्सटॅार्शन कांड!

याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या दाम्प्त्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुहास दैवानराव मस्के असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते कर्ज सल्लागार म्हणून काम करतात. त्यांची ओळख गणेश राजाराम भिसे यांच्याशी झाली होती.

या ओळखीतून गणेश भिसे आणि त्याची पत्नी पूजा भिसे यांनी सुहास मस्के यांची फसवणूक केली. या दाम्पत्याने सुहास मस्के यांना त्यांनी काढलेल्या स्वराज जी. बी. इंडस्ट्रीज प्रा.लि. या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितलं. गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. अधिक परतावा मिळवण्यासाठी सुहास यांनीही त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र, ही गोष्ट सुहास मस्के यांना चांगलीच महागात पडली.

माझी बायको होशील का? 13 वर्षीय मुलीसाठी मुलाचं इन्स्टा स्टेटस; पुण्यातील प्रकार

या दाम्पत्याने बरेच दिवस होऊनही पैसे परत दिलेच नाहीत. यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचं सुहास यांच्या लक्षात आलं. ही बाब लक्षात येताच सुहास मस्के यांनी आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्याने आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे हे पोलीस तपासात समोर येणार आहे.

First published:

Tags: Crime news, Financial fraud