मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा मुक्काम; गाढवांनीही अडवली बीडकरांची वाट, VIDEO

Beed : मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा मुक्काम; गाढवांनीही अडवली बीडकरांची वाट, VIDEO

मोकाट जनावरांमुळे रस्त्यांवरील वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार आहे. रस्त्यांवर आपली जनावरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुद्ध नगर परिषदेने कडक कारवाई करण्याची गरज आहे.

    बीड, 09 ऑगस्ट : मोकाट जनावरांच्या (Animals) झुंडींमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यासह वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा जीव धोक्‍यात आला आहे. शहरातील भाजी मंडी, बार्शी चौक. बालेपीर, नगर नाका, अशा प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. या मोकाट जनावरांमुळे रस्त्यांवरील वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार आहे. रस्त्यांवर आपली जनावरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुद्ध नगर परिषदेने कडक कारवाई करण्याची गरज आहे. शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यासह भर रस्त्यात जनावरांच्या भांडणांमुळे वाहनांचे नुकसान देखील होत आहे. या मोकाट जनावरांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. मोकाट जनावरे शाळकरी विद्यार्थ्यांच्या मागे देखील लागतात. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वाधिक रहदारी असणाऱ्या शहरातील जालना रोड, भाजी मंडी, बार्शी चौक. नगर नाका, बालेपीर, यासह शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात मोकाट जनावराचा वावर आहे. हेही वाचा- उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी गाई, बैल, गाढवांची संख्या अधिक मोकाट जनावरांनी वाहनचालक, पादचारी, नागरिकांना हैराण करून टाकला आहे. शाळकरी मुलांना जनावरांमुळे जीव मुठीत धरून रस्त्याने जावे लागते. मोकाट जनावरात गाई, बैल, गाढवांची संख्या अधिक आहे. शहरातील मुख्य बस स्थानक परिसरात देखील हीच परिस्थिती आहे. मोकाट जनावरांसाठी बीड नगर परिषदेने कोंडवाड्याची व्यवस्था केलेली आहे. मात्र, जनावरे रस्त्यावर दिसून येत असल्याचे स्थानिक नागरिक नारायण वाघमारे यांनी सांगितले. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO  दिवसभर जनावरे मोकाट सोडून द्यायची आणि... दिवसभर रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या जनावरांत बहुतांश जनावरांच्या गळ्यात दोरी, घंटा बांधलेली दिसून येते. पोळ्याच्या सणाला हीच जनावरे रंगवलेली दिसून येतात. म्हणजेच दिवसभर जनावरे मोकाट सोडून द्यायची आणि रात्री आपल्या फायद्यासाठी घरी आणायची असा उद्योग जनावरांच्या मालकांनी चालवलेला आहे. रस्त्यांवर आपली जनावरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुद्ध नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे. शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई होणार आहे. ही मोकाट जनावरे ज्याची असतील त्यांनी घेऊन जावे, अन्यथा कोंडवाड्यात टाकली जातील, असे नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश ढाकणे यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Beed, Beed news, बीड

    पुढील बातम्या