Home /News /maharashtra /

12 किमी पायपीट, काही महिन्यांपूर्वी कोरोनावर मात, रौप्य पदक विजेता अविनाश साबळेच्या वडिलांनी सांगितली Untold Story

12 किमी पायपीट, काही महिन्यांपूर्वी कोरोनावर मात, रौप्य पदक विजेता अविनाश साबळेच्या वडिलांनी सांगितली Untold Story

अविनाश आणि वडील मुकुंद साबळे

अविनाश आणि वडील मुकुंद साबळे

अविनाशने याआधी देखील अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. पण यावेळची कॉमनवेल्थ स्पर्धा त्याच्यासाठी खूप खास होती. अविनाशने आपली सर्वोत्तम कामगिरी करत 8 मिनिटे 11.20 सेकंद घेत शर्यत जिंकली.

    बीड, 6 ऑगस्ट : बीडच्या शेतकरी पुत्राने राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) कमाल केली आहे. 3 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला नवीन राष्ट्रीय विक्रमासह रौप्य पदक मिळवून दिले आहे. अविनाश साबळेने ((Avinash Sable) राष्ट्रीय विक्रम मोडत 8:11.20 अशी वेळ घेत पदक जिंकले. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाशने वैयक्तिक सर्वोत्कृष्ट तसेच राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. हलाखीच्या परिस्थितीतून मुलानं मोठ्या जिद्दीने हे नाव कमावले. आज मोठा आनंद झाल्याचं अविनाशचे वडील मुकुंद साबळे यांनी 'News18 लोकल'शी बोलताना सांगितले. अविनाशने याआधी देखील अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. पण यावेळची कॉमनवेल्थ स्पर्धा त्याच्यासाठी खूप खास होती. अविनाशने आपली सर्वोत्तम कामगिरी करत 8 मिनिटे 11.20 सेकंद घेत शर्यत जिंकली. या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा अविनाश हा पहिला भारतीय खेळाडू ठरला असून सर्वच स्तरातून त्याचे कौतूक होत आहे. हेही वाचा- उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी अविनाश हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा. रौप्य पदक मिळाल्यानंतर त्यांच्या परिवाराचा आनंद पारावर उरला नाही. अविनाशने जगाच्या पाठीवर देशाचे नाव उंचावले आहे. मला खूप आनंद झाला आहे. अविनाशला मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाने गाठले होते. मात्र अविनाशने जिद्दीच्या जीवावर आज रौप्य पदकापर्यंत मजल मारली. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO माझे शिक्षण जरी दुसरीपर्यंत झाले असले तरी अविनाशला शिकवायची जिद्द होती. घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने अविनाशला अनेक संकटांचा सामना करावा लागला. अविनाशची शाळा 5 ते 6 किमी दूर होती. इतर मुलं सायकलीने ये-जा करायचे. मात्र, आमची आर्थिक स्थिती नसल्याने अविनाशला सायकल घेता आली नाही. त्यावेळी अविनाश चालत- पळत शाळेत जात असे. पहिल्यापासूनच अविनाशला खेळामध्ये रुची होती. परिस्थिती राहील तशी राहील पण शिक्षण आणि खेळासाठी काही कमी पडू देणार नाही, असा खंबीर पाठिंबा अविनाशला वडिलांचा होता. याच्याच जोरावर आणि मोठ्या मेहनतीने अविनाशने आज चमकदार कामगिरी केली आहे. बीड सारख्या दुर्गम भागातून जाऊन अविनाशने देशाची मान उंचावली असल्यामुळे अविनाशचा मला सार्थ अभिमान असल्याचे मुकुंद साबळे यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Beed, Beed news, Sports

    पुढील बातम्या