बीड, 22 जुलै : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशीच काहीशी स्थिती शेतकऱ्यांची (Farmer) असते. पारंपारिक पद्धतीच्या शेतीतून खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. यामुळे शेतीतून परवडेल असे उत्पन्न काढायचे असेल तर प्रयोगशील शेती (Experimental agriculture) करणे आवश्यक आहे. हे ओळखून बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक शेती करत दुष्काळी भागात लाखो रुपयाचे उत्पन्न हाती घेतले आहे. पाहूयात या प्रयोगशील शेतकऱ्याची ही प्रेरणादायी यशोगाथा.
वडवणी तालुक्यातील काडीवडगाव हे माजलगाव धरणालगत असणारे गाव. या भागातील बहुतांश शेतकरी कापूस, ऊस, सोयाबीन, तूर अशी नगदी पीक पारंपारिक पद्धतीने घेतात. यातून म्हणावे तेवढे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती क्वचितच मिळते. मात्र गावातील प्रल्हाद गवारे (Prahlad Gaware) यांनी या पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या शेतात आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याकडील दीड एकर शेतीत 27 प्रकारची पिकं घेतली. या पिकांसाठी प्रल्हाद यांनी पॉलीहाऊस उभे केले. पॉलीहाऊसचा वापर संरक्षित शेतीसाठी केला जातो. पॉलीहाऊसचा वापर केल्यामुळे पिकांचे उत्पादन चार ते पाच टक्क्यांनी वाढवता येते.
आतापर्यंत साडेनऊ लाख रुपयांचे उत्पन्न हाती2017 पर्यंत जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती होती. धरणाजवळ असताना देखील ग्रामस्थांना दुष्काळाचा सामना करावा लागला. या स्थितीत कमी पाण्याची शेती म्हणून गवारे यांनी आधुनिक शेतीची कास धरली. सध्या त्यांच्या पॉलीहाऊसमध्ये शिमला मिरचीचे पिक चांगलंच बहरले आहे. शिमला मिरची बरोबरच गवारे यांनी हिरव्या मिरचीचं पीक देखील घेतलं आहे. सध्या मिरचीची तोडणी होत असून 8 टन एवढे विक्रमी मिरचीचे उत्पादन हाती आले आहे. टरबुज पिकात अंतर्गत पीक म्हणून मिरचीची लागवड केलेली आहे. शिमला मिरचीचे देखील 18 टन उत्पादन आले असून आणखी 4 टन उत्पादनाची अपेक्षा आहे. यातून गवारे यांना आतापर्यंत साडेनऊ लाख रुपयांचे उत्पन्न हाती आल्याचं गवारे सांगतात.हेही वाचा-Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त
कोरोना काळात शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले. भाजीपाल्याला भाव मिळेल का, या भीतीपोटी यावर्षी जिल्ह्यात भाजीपाल्याची लागवड कमी झाली आहे. परिणामी मिरचीला चांगला भाव मिळत आहे. अधिक उत्पादन असेल तर बांधावरच येऊन व्यापारी मालाची खरेदी करतात यातून वाहतूक खर्च देखील वाचत आहे.
शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांचे प्रयोगमागील पंधरा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून मी शेती करत असून या शेतीत कापूस किंवा उसाचे उत्पादन न घेता आधुनिक शेती करत आहे. शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग केले. आणि ते यशस्वी देखील होत असून यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत आधुनिक शेती करून शेतात नवनवीन प्रयोग करावेत. यासाठी आवश्यक असल्यास मार्गदर्शन देखील घ्यावे, असे प्रल्हाद गवारे (संपर्क क्रमांक- 8275521597) यांनी सांगितले. हेही वाचा-Beed : दिल्लीच्या कार्यक्रमात सादर होणार अस्सल लावणी; बीडची 'ही' तरुणी करणार सादरीकरण, VIDEOकृषी भूषण पुरस्काराने सन्मानितवसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने प्रल्हाद गवारे यांना 2017 रोजी सन्मानित करण्यात आले. मोसंबी, केळी, सिमला मिरची, भाजीपाला यात विक्रमी उत्पादन घेणारा वडवणी तालुक्यात हा पहिला शेतकरी आहे. त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रल्हाद यांनी शेतीबाबत मार्गदर्शन केले आहे. दूरदर्शन, आकाशवाणी, खाजगी वृत्त संस्था, सोशल मीडिया व अनेक वर्तमानपत्रांच्या माध्यमातून प्रल्हाद यांचे शेती मार्गदर्शन प्रकाशित झाले आहे. प्रल्हाद यांच्या आधुनिक शेतीची चर्चा परिसरात होते. आम्ही देखील या शेतीबाबत ऐकलं होतं आज प्रत्यक्ष येऊन शेतीची पाहणी केली. याठिकाणी प्रल्हाद याचे मोलाचे मार्गदर्शन देखील लाभल्याचे शेतकरी अशोक निपटे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.