मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed : भंगारातील साहित्यापासून बनविले देशी जुगाड; दुचाकीने चालणाऱ्या यंत्राची चर्चा तर होणारच!

Beed : भंगारातील साहित्यापासून बनविले देशी जुगाड; दुचाकीने चालणाऱ्या यंत्राची चर्चा तर होणारच!

दुचाकीने चालणारे फवारणी यंत्र

दुचाकीने चालणारे फवारणी यंत्र

पाथरा येथील प्रवीण पवार (Praveen Pawar) या शेतकऱ्याने देशी जुगाडातून फवारणी यंत्राची (Spray machine) निर्मिती केली आहे. या यंत्रांची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा होत आहे.

  बीड, 13 ऑगस्ट : शेतीतील (Agriculture) उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यात केलेल्या कष्टाच्या तुलनेत उत्पन्नाचा मेळ बसत नाही. यामुळे कष्ट कमी करणे आणि खर्च जास्तीत जास्त वाचवणे गरजेचे आहे. यासाठी शेतीत संशोधक वृत्ती महत्त्वाची आहे, अशाच वृत्तीतून केज तालुक्यातील पाथरा येथील प्रवीण पवार (Praveen Pawar) या शेतकऱ्याने देशी जुगाडातून फवारणी यंत्राची (Spray machine) निर्मिती केली आहे. या यंत्रांची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा होत आहे.

  सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या तर अनेक कामे सहज आणि सोपी होतील. असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असे जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकतात.

  यंत्र कसे केले तयार

  शेती करणे ही खर्चीक बाब आहे. कामासाठी मजूर मिळत नाहीत. अशा स्थितीत शेती करणे कठीण झाले आहे. शेतीसाठी मजूर न मिळणे हे दिवसेंदिवस मोठी समस्या बनत आहे. यावर उपाय म्हणून तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता प्रवीण त्यांनी रोजच्या वापरात असलेली दुचाकी, भंगारातील साहित्य, दोन कॅन, फवारणीचे नोझल व पाईप या साहित्याद्वारे देशी जुगाड करत फवारणी यंत्र बनवले आहे. या यंत्र निर्मितीसाठी प्रवीण यांना केवळ 4 ते 5 हजार रुपये खर्च झाला आहे. 

  हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली मेक्सिकोतील फळबाग; आधुनिक शेतीतून महिलेची लाखोंची कमाई

  पाठीवर 20 ते 30 लीटर ओझे घेऊन फवारणी करणे अतिशय कष्टाचे काम. यातच जुन्या पद्धतीने फवारणी करणे हे अधिक खर्चीक, अधिक वेळ लागणारे काम. बऱ्याच वेळा सर्व पिकांवर समतोल फवारणी होत नाही. तसेच वाढलेल्या पिकात फवारणी करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. कारण वाढलेल्या पिकात विंचू, साप, असण्याची भीती असते.

  5 लीटर पेट्रोलमध्ये 15 ते 20 एकर फवारणी 

  शेतकऱ्यांना पाठीवर फवारणी यंत्र घेऊन फवारणीसाठी मोठे शारीरिक कष्ट लागते. यासह फवारणीसाठी औषध, पाणी पुरवण्यासाठी अतिरिक्त दोन व्यक्तींची गरज असते. अशापद्धतीने दिवसाकाठी 7 ते 8 एकराची फवारणी करणे शक्य होते. परंतु प्रवीण यांनी बनवलेल्या यंत्राद्वारे 1 एकरची फवारणी केवळ 15 ते 20 मिनिटांत होते. यासाठी 250 ते 300 मिली एवढ्याच पेट्रोल इंधनाचा वापर होतो. 5 लीटर पेट्रोलमध्ये 15 ते 20 एकर फवारणी शक्य आहे. या यंत्रासाठी 40 लीटरचे दोन कॅन बसवण्यात आले असून 80 लीटर एवढे फवारणीसाठी लागणारे औषध एकाच वेळी टाकून फवारणी केली जाऊ शकते.

  हेही वाचा- शाळेत मन रमेना म्हणून सुरू केला व्यवसाय; 17 व्या वर्षीच लाखोंची कमाई

  गेल्या वर्षी शेतात फवारणीसाठी काही कामगार लावले होते. मात्र, फवारणीसाठी पूर्ण दिवस गेला. त्यातच अतिरिक्त 2 कामगार देखील लावावे लागत होते. फवारणी करताना कीटकनाशकांमुळे उलटी होणे, मळमळ होणे, असे आजार कामगारांना झाले होते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन मी हे यंत्र तयार केले. आर्थिक दृष्ट्या देखील यंत्र परवडत असल्याचे शेतकरी प्रवीण पवार (संपर्क क्रमांक 9822573150) यांनी सांगितले. 

  First published:

  Tags: Beed, Beed news, Farmer, बीड, शेतकरी