मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed : हौसेला मोल नाही! एका व्यक्तीच्या वार्षिक कमाईपेक्षा जास्त कुत्र्यावर खर्च, Video

Beed : हौसेला मोल नाही! एका व्यक्तीच्या वार्षिक कमाईपेक्षा जास्त कुत्र्यावर खर्च, Video

X
महागड्या

महागड्या गाड्या, मोबाईल खरेदीची हौस अनेकांना असल्याचे आपण पाहिले आहे. यात आता आणखी एका ट्रेंडची भर पडली असून महागडे श्वान देखील पाळले जात आहेत.

महागड्या गाड्या, मोबाईल खरेदीची हौस अनेकांना असल्याचे आपण पाहिले आहे. यात आता आणखी एका ट्रेंडची भर पडली असून महागडे श्वान देखील पाळले जात आहेत.

 • Local18
 • Last Updated :
 • Bid Rural, India

  बीड, 03 जानेवारी : हौसेला कधीच मोल नसते हे वारंवार सिद्ध झाले आहे. महागड्या गाड्या, मोबाईल खरेदीची हौस अनेकांना असल्याचे आपण पाहिले आहे. यात आता आणखी एका ट्रेंडची भर पडली असून महागडे श्वान देखील पाळले जात आहेत. या श्वानांच्या किमती तर लाखापर्यंत आहेतच शिवाय खाद्य, आरोग्यावर होणारा खर्च देखील अधिक आहे.

  बीडकरांना विदेशी ब्रिडच्या श्वानांची भुरळ पडली आहे. असे श्वान पाळण्याचा जणू नवीन ट्रेंडचा आला असल्याचे पाहायला मिळत आहे. जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन, लॅब्रेडोर, ग्रेट डेन, अशा विदेशी ब्रिड पाळण्याकडे श्वान प्रेमींचा कल आहे. मात्र, या श्वानांच्या पालन पोषणाला महिन्याकाठी हजारोंचा खर्च देखील होत आहे.

  विविध जातींचे विदेशी श्वान पाळण्याचा ट्रेंड गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये वाढू लागला आहे. लहान मुलांचे श्वान पाळण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. मात्र दिसायला जरी हे श्वान एकदम गोंडस आणि छान असले तरी याचा पालनपोषणाचा खर्च महिन्याकाठी मोठा आहे. 

  बीड जिल्ह्यामध्ये अनेक श्रीमंत व मध्यमवर्गीय कुटुंबांकडे विदेशी श्वान पाळले जातात. छंद म्हणून पाळले जाणारे हे श्वान जणू काही कुटुंबातील लाडके सदस्यच असतात. त्याचबरोबर त्यांना लळा लावणे व त्यांचा वाढदिवस साजरी करणे विविध कार्य समारंभात त्याला कुटुंबाप्रमाणे सामील करून घेतले जाते. 

  श्वानासाठी वेगवेगळे पेट शॉप उपलब्ध आहेत. त्यामध्ये मिळणारे खाद्यपदार्थ व श्वानाला लागणारे मेडिकल रोजच्या अंघोळी साठीचा शाम्पू याच्या दारात देखील मागील काही महिन्यांमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी  वाढ झाली आहे. यामुळे श्वान पाळणे अधिक खर्चीक बाब बनले आहे.

  Beed : पारंपरिक गुऱ्हाळ घरं का बंद पडत आहेत? वाचा कारणं

  खाद्यावर, आरोग्यावर होणारा खर्च

  लॅब्रोडोर - 6000, जर्मन शेफर्ड- 5500, पोमोरियन-3000, ग्रेट डेन-65000, सेंट्रल एशियन शेफर्ड-12500 रुपये महिना खर्च होतो.

  वाढती महागाई

  घरच्या मिळणाऱ्या अन्नातून श्वानाला परिपूर्ण पाहिजे तेवढे विटामिन सत्व मिळत नाहीत. त्यामुळे आवश्यक तेवढी वयात वाढ होत नाही. त्यात भारतीय ब्रिडच्या श्वानासाठी खाद्य 300 ते 500 रुपये किलो मिळते तर तर विदेशी ब्रिडचे खाद्य 700 ते 800 रुपये किलोपर्यंत बाजारात मिळत असल्याचे  पेट फूड व्यावसायिक अन्वर शेख यांनी सांगितले. 

  First published:
  top videos

   Tags: Beed, Local18