मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मराठवाडा मुक्ती दिन : स्वातंत्र्य लढ्यातील 'अनसीन हीरोज', पाहा Video

मराठवाडा मुक्ती दिन : स्वातंत्र्य लढ्यातील 'अनसीन हीरोज', पाहा Video

Marathwada Mukti din : मराठवाडा स्वातंत्र्य लढ्यातील माहिती चित्र स्वरूपात पाहण्यासाठी नागरिक तसेच शाळकरी मुलांनी गर्दी केली होती.

बीड, 17 सप्टेंबर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. मराठवाडा स्वातंत्र्य लढ्यातील माहिती चित्र स्वरूपात पाहण्यासाठी नागरिक तसेच शाळकरी मुलांनी गर्दी केली होती. मोफत असणाऱ्या प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. जीवनगाथांचे छायाचित्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि देशाचा 75 वा अमृत महोत्सवी दिनानिमित्त दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. शहरातील भाजी मंडी परिसरातील अहिल्याबाई सांस्कृतिक सभागृहात हे प्रदर्शन ठेवण्यात आले. भारतीय स्वतंत्र लढ्यातील 1857 ते 1947 दरम्यानच्या विविध महत्त्वाच्या घडामोडी आणि थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनगाथांचे छायाचित्रांद्वारे दर्शन घडवण्यात आले आहे. स्वतंत्र लढ्याची माहिती चित्र स्वरूपात पाहण्यासाठी या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. मुक्ती संग्रामातील शूरवीर मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त व्हावा यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानी दिवस रात्र एक केली. त्यापैकीच श्यामराव बोधनकर, भगवानराव गांजवे, गोपाळ शास्त्री, देव गुलाबचंद नागोरी, तुकाराम शहाजी वाघ, देवसिंग चव्हाण, श्रीनिवास राव अहंकारी. लक्ष्मणराव गानू, याची छायाचित्रे प्रदर्शनासाठी आहेत.  संग्रामातील शूरवीर महिला मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये शूरवीर महिलांचाही सहभाग होता त्यात दगडाबाई शेळके, ताराबाई परांजपे, कुसुम जोशी, प्रतिभाताई वंशपायन, कांता देशपांडे, गीताबाई चाटणकर, शांताबाई कोटेच्या, चंदाताई जरीवाला, याचेही फोटो प्रदर्शनात ठेवले असल्याची माहिती केंद्रिय संचार बुरोचे क्षेत्रीय प्रसार अधिकारी माधव जायभाय यांनी दिली.  हेही वाचा- मराठवाडा मुक्ती दिन : रझाकार कधीही दार वाजवत... 'वीर' पत्नीनं सांगितला थरारक अनुभव मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे काय? स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा हा विभाग निजामाच्या राजवटीखाली म्हणजेच हैदराबाद संस्थानात सामील होता. देश स्वतंत्र झाल्या मात्र, निजामांचे हैदराबाद संस्थान देशात सामील झाले नव्हते. निजामांच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा तेलंगा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग स्वतंत्र करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो स्वातंत्र्य सैनिकाच्या संघर्षातून हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा सुरू झाला. शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करल्यानंतर मराठवाडा भारतीय संघराज्यात विलीन झाला.  
First published:

Tags: Beed, Beed news

पुढील बातम्या