मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed : कित्येक महिने सफाई नसल्यानं नाले तुंबले, बीडकरांचे आरोग्य धोक्यात! VIDEO

Beed : कित्येक महिने सफाई नसल्यानं नाले तुंबले, बीडकरांचे आरोग्य धोक्यात! VIDEO

X
कचऱ्याने

कचऱ्याने नाल्या तुंबल्या

किरकोळ पावसाच्या पाण्यानेही शहरातील अनेक भागातील नाल्या तुंबल्या असून नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांची गैरसोय होत आहे.

  बीड, 27 जुलै : पावसाळा (Monsoon) सुरू होण्याआधीच बीड शहरात नगरपरिषदेने 'स्वच्छ भारत स्वच्छ शहर' म्हणत स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. मात्र, किरकोळ पावसाच्या पाण्यानेही शहरातील अनेक भागातील नाल्या तुंबल्या (Drains overflowed) असून नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांची गैरसोय होत आहे. नगर परिषदेने पावसाळापूर्व नियोजन व्यवस्थित केले नाही. महिना महिना नाल्यांची स्वच्छता केली जात नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नाल्यातील घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

  पावसाळा सुरू होऊन अवघे दोन महिने लोटले आहेत. यातच बीड शहरात मागील आठवड्यात पावसाची चांगलीच संततधार सुरू होती. त्यामुळेच शहरातील अनेक परिसरातील नाल्यांची स्वच्छता झाली नसल्यामुळे नाल्यांना नद्यांच रूप आलं आहे. पाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे नालीतील पाणी आता नागरिकांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊ लागले आहे. यामुळे शहरातील नागरिक चांगलेच संतापले आहेत. पावसाळा सुरू होण्याआधीच नगरपरिषदेने मोठा गाजावाजा करत स्वच्छता मोहीम सुरू केल्याचे सांगितले होते. पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटले असले तरी नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम कुठल्या परिसरात राबवली असा प्रश्न आता या तुंबलेल्या नाल्या पाहून नागरिकांना पडला आहे. 

  हेही वाचा- एकेकाळी म्हशी राखणारा व्यक्ती सोशल मीडियातून करतोय लाखोंची कमाई, वाचा Success Story

  बीड नगरपरिषदच्या दुर्लक्षाचा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. मोठ्या आणि रुंद नाल्याची सफाई न केल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरले होते. यात व्यापाऱ्याचे नुकसानही झाल आहे. बीड शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात देखील काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळते. स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी देण्यात आल्या आहेत. परंतु नगरपालिका प्रशासनाचे काम धिम्या गतीने होत असल्याने शहरातील संपूर्ण नालेसफाई कधी होणार असाच प्रश्न बीडकरांना पडला आहे.

  स्टेडियम रोड परिसरात नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे पाऊस पडला की नाल्या पूर्ण क्षमतेने भरतात. नाल्यातील साठलेल्या पाण्यामुळे दुर्गंध येते. येथील कचरा आमच्या दुकानाच्या परिसरात येतो. याचा नाहक त्रास ग्राहकांसह आम्हाला देखील सहन करावा लागत असल्याने येथील दुकानदार सांगतात.

  हेही वाचा- पारंपारिक शेतीला फाटा देत 'हे' गाव करतय लाखोंची कमाई, वाचा Special Report

  प्रशासनाचे दुर्लक्ष

  सुभाष रोड, महात्मा फुले पुतळा, स्टेडियम परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. पाऊस पडला की या तुंबलेल्या नाल्यातील पाणी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये जाण्याचा वेळ येते. अशी परिस्थिती एक दोन वेळेस झालेली देखील आहे. मात्र, प्रशासन कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नसल्याचे स्थानिक नागरिक संदीप उबाळे यांनी सांगितले.

  स्वच्छता विभाग उपाययोजना करत आहे

  नगरपरिषदेची स्वच्छता मोहीम सुरू आहे. पावसाच्या पाण्यासह नाल्यात कचरा वाहून येत आहे. यामुळे नाल्या तुंबल्याच्या तक्रारी येत आहेत. स्वच्छता विभाग यावर उपाययोजना करत आहे. नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करून उघड्यावर आणि नाल्यात कसल्याही प्रकारचा कचरा टाकू नये, असे आवाहन बीड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  उमेश ढाकणे यांनी केले आहे.

  First published:
  top videos

   Tags: Beed, Beed news, Maharashtra News