बीड, 4 जानेवारी : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील भेटी आणि कार्यक्रम आटोपून परळीकडं परतत असताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये धनंजय मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत धनंजय मुंडे यांनी स्वत: माहिती दिली असून, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हटलं धनंजय मुंडे यांनी?
मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील भेटी आणि कार्यक्रम आटोपून परळीकडे जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास माझ्या वाहनाचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं छोटासा अपघात झाला आहे. अपघातामध्ये माझ्या छातीला किरकोळ मार लागला आहे. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून, कोणीही अफवांवर विश्वासा ठेवू नये असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dhananjay munde