बीड, 15 जानेवारी : 'नाथांचा आशिर्वाद घेण्यासाठी गहिनीनाथ गडावर आलो. माझ्या राजकारणात गोपीनाथांचा आशीर्वाद मिळाला' असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा नामुल्लेख टाळला. आपल्या 15 मिनिटांच्या भाषणात फक्त माजी पालकमंत्री म्हणूनच पंकजा यांचा एकदाच उल्लेख केला.
बीडच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आयोजित संत वामनभाऊ महाराज यांच्या 47 व्या पुण्यतिथी सोहळयाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. मात्र या कार्यक्रमाला मुंडे भगिणी गैरहजर होत्या. देवेंद्र फडणवीस यांनीही पंधरा मिनिटांच्या भाषणामध्ये ओझरता माजी पालकमंत्री पंकजा मुंडे असा उल्लेख केला.
LIVE | श्री संत वामनभाऊ महाराज यांचा 47 वा पुण्यतिथी महोत्सव | श्री क्षेत्र गहिनीनाथगड, बीड https://t.co/vtLmpHqUF3
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 15, 2023
'गहिनीनाथ गडावरील विकासाचा आराखडा पूर्ण केला जाईल तसंच समुद्राला वाहून जाणारे हक्काचे पाणी वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याला दिले जाईल. या भगीरथ प्रयत्नासाठी संत वामनभाऊंनी आशीर्वाद द्यावा अशी मागणी ही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
(शिवरायांना पुष्पहार अर्पण केला अन् सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, VIDEO)
गहिनीनाथ गडावरील भगवा ध्वज हा नुसता ध्वज नसून जबाबदारी आहे. ती समर्थपणे पेलणार आहे. इथे आल्यानंतर मराठवाड्याची पंढरी पाहायला मिळाली. मुंबईवरून हेलिकॉप्टरने येताना अरबी समुद्र पाहिला आणि इथं आल्यानंतर गहिनाथ गडावरील भक्तीचा समुद्र पाहायला मिळाला. देवाच्या मनात असेल तर तो दर्शनासाठी बोलावतो आज वामन भाऊंनी बोलावले म्हणून मी इथे आलो. नाथ आणि वारकरी संप्रदायाचे मूळ या पवित्र स्थानावर आहे. देश देव आणि धर्म वारकरी संप्रदायामुळेच वाचला. संस्कार आणि संस्कृती संवर्धनाचे काम वारकरी संप्रदायाने केले. आद्य ठिकाण वसलेल्या गहीनाथगडाचा विकास आराखडा लवकरच पूर्ण केला जाईल, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
(पंकजा मुंडे भाजपावर नाराज आहेत का? विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं)
विशेष म्हणजे, गहीनाथ गडावरील कार्यक्रमास पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांची अनुपस्थिती होती. प्रत्येक वर्षी न चुकता पुण्यतिथी उत्सवाला पंकजा मुंडे उपस्थित असतात मात्र यावर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना आजारी असल्याचे कारण काढून पंकजा मुंडे यांनी दांडी मारली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
बीड सह महाराष्ट्राच्या राजकारणात परिणामकारक समजला जाणाऱ्या भगवानगड या लाखो भाई भक्तांच्या श्रद्धास्थानावरील कार्यक्रमाला पंकजा मुंडें यांनी पाठ फिरवणे यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बीड जिल्ह्यातील राजकारणावर गड आणि फडांचा मोठा प्रभाव आहे.. पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगड या भगवान भक्ती गडापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमास मुंडे कुटुंबातील नेत्यांची गैर हजेरीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे