Home /News /maharashtra /

Beed : सायबर गुन्ह्यात दिवसागणिक वाढ; विद्यार्थी, व्यापारी होताहेत शिकार Special report

Beed : सायबर गुन्ह्यात दिवसागणिक वाढ; विद्यार्थी, व्यापारी होताहेत शिकार Special report

title=

सायबर गुन्हेगारी काही वर्षांपूर्वी विशेत: शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र, ग्रामीण भागातही मोबाईट आणि इंटरनेचा वापर वाढला आहे. याचाच फायदा घेत ग्रामीण भागातील लोकांना लक्ष्य करत फसवणूक केली जाते असल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले आहे. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील नागरिकांना लाखो रुपयाचा गंडा घालण्याचे काम हॅकर्स करत आहेत.

पुढे वाचा ...
    बीड, 30 जून : वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळं लोकांचे आयुष्य अधिक सहज आणि सोपे झालं आहे. पण, दिवसेंदिवस वाढता संगणक व इंटरनेटचा वापर आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांत (Cyber Crime) होणारी वाढ ही चिंताजनक बाब बनली आहे. यात आर्थिक फसवणुकीची (Financial fraud) प्रकरणं आघाडीवर आहेत. व्यापारी, किशोरवयीन विद्यार्थीही याला बळी पडण्याचं प्रमाण वाढू लागले आहे. बीड जिल्ह्यात 2021 मध्ये सायबर विभागात एकूण 450 तक्रार दाखल झाल्या. यातील 242 तक्रारी या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या आहेत. तर 208 सोशल मीडिया संबंधित तक्रारी दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यात गत वर्षी सर्व प्रकरणे मिळूण तब्बल एक कोटीची फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. एका क्लिकवर जगाच्या कुठल्याही ठिकाणी आपण पैसे पाठवू शकतो. मात्र, एका चुकीच्या क्लिकमुळे आपले बँक खाते रिकामे देखील होऊ शकते. जेवढे सोशल मीडियाचे चांगले फायदे आहेत तेवढेच तोटे देखील आहेत. सोशल मिडियाचा वापरकरुन फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये मोठी वाढ होत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी देखील बीड येथील सायबर क्राईममध्ये नोंदविल्या जात आहेत. सायबर गुन्हेगारी काही वर्षांपूर्वी विशेत: शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र, ग्रामीण भागातही मोबाईट आणि  इंटरनेचा वापर वाढला आहे. याचाच फायदा घेत ग्रामीण भागातील लोकांना लक्ष्य करत फसवणूक केली जाते असल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले आहे. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील नागरिकांना लाखो रुपयाचा गंडा घालण्याचे काम हॅकर्स करत आहेत. हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का?  इंटरनेट हे आता गावोगावी पोहोचले आहे आणि सर्वांच्यात हातात स्मार्टफोन आल्याने ऑनलाइन व्यवहार देखील अगदी सोपे झाले आहेत. यासोबतच सर्वांच्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे अॅप आणि वेगवेगळ्या सोशल साई़डवरू सर्च वाढले आहे. यात चुकून एखाद्या चुकीच्या लिंकवर किंवा पेजवर क्लिक केल्यास तुमची मोठी फसवणूक होवू शकते.  मागली वर्षी 450 फसवणुकीच्या तक्रारी  बीड जिल्ह्यात 2021 मध्ये सायबर विभागात एकूण 450 तक्रार दाखल झाल्या. यातील 242 तक्रारी या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या आहेत. तर 208 सोशल मीडिया संबंधित तक्रारी दाखल झाल्या आहेत. बीड सायबर विभागाने 242 आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी पैकी 220 तक्रारी निकाली काढल्या तर 208 सोशल मीडियाच्या तक्रारी पैकी 208 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. 2021 मध्ये सायबर विभागात 66 गुन्ह्यांची नोंद झाली आहे यात 7 गुन्हे निकाली काढण्यात आले असून यात आतापर्यंत 10 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. कशी होते फसवणूक अनेक सोशल साईडवरुन, ॲप्लिकेशनच्या माध्यमातून डेटा चोरला जातो. यातील लोकांना फोनद्वारे संपर्क करुन तुम्हाला लॉटरी लागली किंवा एखादे कुपन लागले, किेंवा तुमच्या बँकेचे काही अपडेट करायचे आहे, असे सांगून मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जातो किंवा बँक खात्याचा तपशील, यात एटीएम कार्डवरील मागच्या बाजूला दिसणारे शेवटचे क्रमांक विचारले जातात किंवा एक लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितली जाते यातून तुमची फसवणूक केली जाते. फसवणुकीत व्यापाऱ्यांचे प्रमाण अधिक  अनेकदा नागरिकांना सायबर क्राईमसारख्या गोंष्टींबद्दल माहिती नसते. आणि त्याच्या नकळत ते सायबर क्राईमला बळी पडतात. बीड जिल्ह्यात फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. यात किशोरवयीन मुले, व्यापारी यांना लक्ष्य केले जात आहे, मागील काही दिवसात बीड शहरातील व्यापाऱ्यांना ऑनलाइन लाखो रुपयांना गंडा लावण्यात आला होता. जिल्ह्यात गत वर्षी तब्बल एक कोटींची फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  कुठल्या वयातील नागरिकांची फसवणूक होते? लॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्था, शिक्षण आणि मनोरंजन या तिन्ही गोष्टी सायबर स्पेसमध्ये आल्या. मोबाइल, संगणकाचा वापर वाढला. या गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. सध्या लहान मुलांपासून ते वयस्कर नागरिकांपर्यंत सर्वजण स्मार्टफोनचा वापर मोठ्या संख्येनं करत असल्याचे पाहायला मिळते. यातच ऑनलाइन फ्रॉडच्या घटना घडतात. 20 ते 50 वर्ष वयोगटील व्यक्तींच्या अधिक प्रमाणात फसवणूक होत असल्याचे सायबर एक्सपर्ट सांगतात. वाचा- बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT हॅकर नेमके कोण असतात? फसवणूक करणाऱ्यांमध्ये संगणकाचे उत्तम ज्ञान असते. यांचे वय साधारण: 20 ते 30 वयातील असल्याचे अनेक प्रकणामधून समोर आले आहे.  पोलीस हॅकरचा कसा करतात तपास? दाखल एफआयआर मधून क्लिनचीट आणि तांत्रिक उपकरणांची मदत घेत पोलीस आरोपींपर्यंत पोहोचतात. कधीच अचानक लाखो रुपयाची लॉटरी किंवा बक्षीस लागत नसते. नागरिकांनी अशा कुठल्याच आमिषाला बळी पडू नये. बँकेबातची गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करु नये. बॅकेकडून फोनवर कधीही अशी माहिती मागवली जात नाही. सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य होऊ नये म्हणून अधिकाधिक सतर्कता बाळगणे हाच यावर उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणूक झाल्याची लक्षात येताच जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नियंत्रण कक्ष बीड इथे देखील नागरिक संपर्क साधू शकतात (02442 222333), अशी माहिती सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी दिली.   
    First published:

    Tags: Beed news, Cyber crime, Online fraud

    पुढील बातम्या