Home /News /maharashtra /

Beed News: बाप बनला हैवान! पोटच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Beed News: बाप बनला हैवान! पोटच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात उघड झाली आहे.

बीड, 18 जून : वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात उघड झाली आहे.36 वर्षीय जन्मदात्या नराधम बापानेच, आपल्या पोटच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) अत्याचार केलाय. , बीडच्या शिरूर कासार तालुक्यात घडलीय. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार  13 जूनच्या मध्यरात्री आठवीच्या वर्गात शिकत असलेली पीडित मुलगी, तिच्या घरासमोरील अंगणात बाजेवर झोपली होती. यावेळी आरोपी नराधम बापाने तिला खाली झोपायला सांगितले. त्यांनतर  मध्यरात्री 2 च्या दरम्यान बापाच्या नावाला कलंक असलेल्या नराधमाने, पोटच्या मुलीवर अत्याचार केला. यावेळी पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर बाजूला झोपलेली तिची आई जागी झाली. मात्र तिला आरोपी नराधमाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ती काहीच करू शकली नाही. विशेष म्हणजे या सर्व प्रकारानंतरही पीडित मुलीच्या आईने तिला दोन दिवस पोलिसात तक्रार करू दिली नाही दिली नाही.अखेर पीडित मुलीच्या आजीने पीडितेला बरोबर घेऊन शिरूर कासार पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. हत्येनंतर रात्रभर पत्नीच्या मृतदेहाजवळ झोपला पती; कारण जाणून बसेल धक्का दरम्यान, पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी नराधम बापाविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात, बाललैंगिक अत्याचार , पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासला असून नराधम आरोपी बापाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या नराधम बापाला कठोरात कठोर शासन करावं अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
Published by:Onkar Danke
First published:

Tags: Beed news, Crime

पुढील बातम्या