Home /News /maharashtra /

देव तारी त्याला कोण मारी! भरधाव टँकर दिंडीत घुसला तरी 15 महिला वारकरी वाचल्या

देव तारी त्याला कोण मारी! भरधाव टँकर दिंडीत घुसला तरी 15 महिला वारकरी वाचल्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

बीड शहराजवळील पाली येथे नागनाथ मंदिराजवळ वारकऱ्यांसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने अन्नदान व आरोग्य तपासणीचे सेवा सात दिवसापासून सुरू आहे.

  सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 28 जून : देव तारी त्याला कोण मारी, अशी प्रचिती आज बीडमध्ये (Beed) आली. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर (Solapur Dhule National Highway) बीडच्या पाली गावात कंटेनरने दिंडीमधील पाण्याच्या टँकरला धडक दिली. (Container hit water tanker in wari) शेकडो भाविक भक्त रस्त्याच्या कडेला जेवणासाठी थांबले होते. मात्र, अपघात झाल्याने अचानक एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली. दारू पिऊन चालवली गाडी - या घटनेत टँकरचालक जखमी झाला आहे. तर 10 ते 15 महिला भाविक टँकर शेजारी बसल्या होत्या. मात्र, पांडुरंगाची कृपा म्हणून आम्ही सुखरुप वाचलो, अशी भावना वारकरी भाविकांनी व्यक्त केली. त्यानंतर काही काळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कंटेनरचा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामुळे कंटेनर चालकाला वारकऱ्यांनी चांगला चोप दिला. पांडुरंगाची कृपा म्हणून वाचलो -
  बीड शहराजवळील पाली येथे नागनाथ मंदिराजवळ वारकऱ्यांसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने अन्नदान व आरोग्य तपासणीचे सेवा सात दिवसापासून सुरू आहे. या ठिकाणी जालना जिल्ह्यातील श्रीदत्त आश्रम वीर पिंपळगाव येथील दिंडी जेवणासाठी थांबलेली असताना अचानक भरधाव कंटेनर दिंडीमध्ये घुसला. यावेळी टँकरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या पाण्याच्या टँकरला धडक दिली. त्यामुळे टँकर पलटी झाला.
  कंटेनर भरधाव वेगात होता. तसेच ड्रायव्हरने दारू पिलेले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात एवढा भीषण होता की मोठा आवाज झाला. सुदैवाने दहा ते पंधरा महिला बाल बाल बचावल्या. त्यावेळी पांडुरंगाची कृपा म्हणूनच आम्ही सुखरूप बचावलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या.
  Published by:News18 Desk
  First published:

  पुढील बातम्या