बीड, 22 जानेवारी : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या कार्यक्रमाला पंकडा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे या गैरहजर होत्या त्यामुळे चर्चेला आणखी उधण आलं. त्यातच भर म्हणजे आता 'महाराष्ट्र काँग्रेस'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्या आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंकजा मुंडे यांनी त्यांना बोलू देण्याची विनंती केली, मात्र, बावनकुळे यांनी मुंडे यांना त्यांच्या आधी बोलू दिलं नाही.
काँग्रेसचा भाजपवर निशाणा
हा व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसनं भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. 'जे स्वतःच्या पक्षातीलच एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलून देत नसतील ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील याचा विचार न केलेलाच बरा. शेवटी काय भाजपचे संस्कार म्हंटल्यावर असच होणार!' अशी जळजळीत टीका काँग्रेसने भाजपावर केली आहे.
जे स्वतःच्या पक्षातीलच एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलून देत नसतील ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील याचा विचार न केलेलाच बरा.
शेवटी काय भाजपचे संस्कार म्हंटल्यावर असच होणार! pic.twitter.com/GIyQZJDRAe — Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 21, 2023
पंकजा मुंंडेंकडून नाराज नसल्याचं स्पष्टीकरण
गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी आपण पक्षावर नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी जन्मापासूनच भाजपची कार्यकर्ता आहे. मुंडेसाहेब आणि भाजपला वेगळं करता येणार नाही. भाजप हा पक्ष एक व्यक्ती नसून संस्था असल्याचं मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये आयोजित एका प्रचार सभेत म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pankaja munde