बीड, 25 जानेवारी : शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा यांच्यासह अन्य एकावर, फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून बीड जिल्ह्यात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये आणि केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करुणा शर्मा यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात, धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असणाऱ्या बालाजी दहिफळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोपही या तक्रारीतून करण्यात आला होता. मात्र ज्यांच्या विरोधात शर्मा यांनी तक्रार दाखल केलीय, त्यांनी देखील काल परळी पोलीस ठाण्यामध्ये शर्मा यांच्या विरोधात धमकी देत शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे.
('हार के जीतने वाले को..' सिकंदरने उचलली 'भीमा केसरी'ची गदा, VIDEO)
दरम्यान याप्रकरणी करुणा शर्मांसह, अजय देडे यांच्यावर परळी पोलीस ठाण्यामध्ये कलम 507, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(राष्ट्रवादीचा 'गेम', या जागेसाठी महाविकासआघाडी सोडून वंचितला पाठिंबा)
तर 'करुणा शर्मा यांनी जे आरोप केले आहेत, ते आरोप खोटे आहेत. जर ते आरोप खरे असतील, त्याचा पुरावा शर्मा यांच्याकडे असेल, तर मला भर चौकात फाशी द्या मात्र माझ्याकडे त्यांनी दिलेल्या धमकीचे, शिवीगाळीचे पुरावे आहेत. ते मी पोलीस अधीक्षकांना देणार आहे' असं म्हणत बालाजी दहिफळे यांनी फेसबुक पोस्ट करत, शर्मा यांनी खुलं आव्हान दिलंय. यामुळे आता शर्मा- मुंडे वाद काय रंग घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.