बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील आठ देवस्थानाच्या जमिनीचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाने सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.
भाऊ, पत्नीवरही गुन्हा दाखल
बीडच्या आष्टी तालुक्यातील आठ देवस्थानाच्या जमीन घोटाळाप्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश धस यांच्यासोबतच त्यांची पत्नी, भाऊ, मनोज रत्नपारखी आणि अस्लम पठाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी या प्रकरणात तक्रार केली होती. राम खाडे यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाने सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मनोज रत्नपारखी आणि अस्लम पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : उदयनराजे यांचे अश्रू म्हणेज...; संजय राऊतांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
धस यांच्या अडचणीत वाढ
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानं आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे 13 (1) (अ) (ब), 13 (2) I p c 465, 468, 471, 120 ब, 109 नुसार आष्टी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Suresh dhas