बीड, 31 डिसेंबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यक्रमाला आले आहे. पण, या कार्यक्रमाला मुंडे भगिनी अनुपस्थितीत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांची इंस्टाग्रामवरील पोस्ट व्हायरल झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बीड जिल्ह्यात असताना पंकजा मुंडेंची अनुपस्थिती होती. यानंतर इंस्टाग्राम वर टाकलेली श्वानाच्या बर्थडेची पोस्ट यामाध्यमातून नेमकं पंकजा मुंडे यांना सांगायचे काय?, अशी चर्चा होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीडमधील कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवल्यानंतर राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, याहीपेक्षा आज पंकजा मुंडे यांची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी आज श्वानाचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ शेअर केला. त्यामुळे या व्हिडिओमधून पंकजा मुंडेंना काय सांगायचं, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
View this post on Instagram
हेही वाचा - बीडमध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमाकडे मुंडे भगिनी फिरवली पाठ, राजकीय चर्चांना उधाण
भाजपमधील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यसनमुक्ती रॅलीचे अनुषंगाने बीड शहरांमध्ये आले असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या दोघांचीही अनुपस्थिती होती. त्यामूळे त्या नाराज आहेत का? कार्यक्रमाला अनुपस्थित का राहिल्या, असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच इंस्टाग्रामवरील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed news, BJP, Devendra Fadnavis, Maharashtra political news, Pankaja munde