Home /News /maharashtra /

Beed : बिंदुसरा नदीपात्र बनले डम्पिंग ग्राऊंड; घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, पाहा, VIDEO

Beed : बिंदुसरा नदीपात्र बनले डम्पिंग ग्राऊंड; घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, पाहा, VIDEO

घातक

घातक कचऱ्याने होऊ शकतात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम...

‘स्वच्छ भारत स्वच्छ शहर'चा (Clean India Clean City) नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे.तसचे पर्यावरणप्रेमींकडून नद्या वाचवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येतात. मात्र, परिसरातील नागरिक कचरा नदीपात्रात आणून टाकतात.

पुढे वाचा ...
    बीड, 9 जुलै: बीड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीपात्रात (Bindusara river) कचरा आणून टाकला जात असल्यामुळे ही नदी आहे की, डम्पिंग ग्राऊंड (Dumping ground) हा प्रश्नच पडला आहे. रुग्णालयातील घातक कचरा देखील नदीपात्रात टाकला जात आहे. 2009 ते 2014 पर्यंत नदीची स्वच्छता मोहीम नगरपरिषद अंतर्गत करण्यात आली. खोलीकरण व साफसफाईसाठी व वेस्टेज वॉटर मॅनेजमेंटसाठी जलसंपदा विभागाने लाखो रुपये निधी देखील दिला. मात्र, सध्या ही नदी घाणीमुळे विद्रुप झाली आहे. पावसाळ्यात शहरात स्वच्छता राबवण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र बिंदुसरा नदीपात्रातील सध्याचे चित्र पाहता खरच इथं स्वच्छता केली का? असा सवाल उपस्थित होत आहे.  ‘स्वच्छ भारत स्वच्छ शहर'चा (Clean India Clean City) नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे.तसचे पर्यावरणप्रेमींकडून नद्या वाचवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येतात. मात्र, परिसरातील नागरिक कचरा नदीपात्रात आणून टाकतात. अशा नागरिकांमुळे आणि प्रशासनाच्या दुर्क्षक्षामुळे नदी प्रदूषित होत असून नदीपात्राचे डम्पिंग ग्राऊंड झाल्याचे चित्र आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. यामुळे परिसरात कायम दुर्गंधी असते. कचऱ्यासोबतच कॅरिबॅग, रुग्णालयातील इंजेक्शने सुया, एक्सपायर झालेले औषध, स्लाईसच्या बाटल्या, गोळ्यांचे रॅपर असा  कचरा देखील नदीत आढळतो. नदीकाठी शेतकरी जनावरे चरण्यासाठी आणतात. येथील घातक कचऱ्यामुळे मुक्या प्राण्याच्या जिवितालाही धोका आहे.  परिसरातील धार्मिक स्थळांनाही त्रास बिंदुसरा नदीपात्राच्या बाजूला धार्मिक मंदिर देखील असून मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नदी शहरातील मुख्य भागांमधून वाहते, नदीमध्ये वेस्टेज वॉटर सोडणे हे कायद्याने गुन्हा आहे. सर्व शहरातील वेस्टेज वॉटर अर्थात घाण पाणी याच नदीत सोडण्यात येत आहे. नदीतील कचरा व पाणी पूढे माजलगाव बॅक वॉटरला जाऊन मिळतो.तिथूनच बीड शहराला पिण्याच्या पाण्याची पुरवठा केला जातो.  नदी घाणीमुळे विद्रुप बिंदुसरा नदी सिंदफना नदीची उपनदी आहे. नदीचे उगमस्थान पाटोदा तालुक्यात आहे. नदीची लांबी 42 किलोमीटर इतकी आहे. बिंदुसरा नदीला बीड तालुक्याची जीवन वाहिनी म्हटलं जाते.  2009 ते 2014 पर्यंत नदीची स्वच्छता मोहीम नगरपरिषद अंतर्गत करण्यात आली. खोलीकरण व साफसफाईसाठी व वेस्टेज वॉटर मॅनेजमेंटसाठी जलसंपदा विभागाने लाखो रुपये निधी देखील दिला. मात्र सध्या ही नदी घाणीमुळे विद्रुप झाली आहे.  “नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होईल.” नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश ढाकणे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की नागरिक या ठिकाणी कचरा आणून टाकत आहेत. मेडिकलचा घातक कचरा देखील नदीपात्रात कोणी टाकत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.  “आम्हाला दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते” नदीच्या अवघ्या काही अंतरावर माझे घर आहे. नदीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे आम्हाला दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देवून येथील स्वच्छता करावी अशी मागणी स्थानिक नागरिक रामनाथ खोड यांनी केली आहे.
    First published:

    Tags: Beed, Beed news, Water

    पुढील बातम्या