Home /News /maharashtra /

Beed : वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा! वारकऱ्यांच्या सेवेसाठी 100 महिलांनी सुरू केली भिशी

Beed : वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा! वारकऱ्यांच्या सेवेसाठी 100 महिलांनी सुरू केली भिशी

शबरीची उष्टी बोर श्री प्रभू श्रीरामाने गोड मानून सेवा केल्याची आख्यायिका आहे याच प्रमाणे पाटोद्यातील 70 वर्षीय आजीबाई कल्पना संचिती यांनी एक अनोखा भक्तिमय उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या संपर्कातील जवळपास शंभर महिलांची महिना केवळ पाच रुपयांची बचत भिशी सुरू केली आहे.

पुढे वाचा ...
    बीड, 23 जून : वारकऱ्यांना ओढ असते ती आषाढी एकादशीची (Ashadhi Ekadashi 2022). याच एकादशीला लाखो वारकरी सध्या पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. अनेक पालख्या ह्या देखील पंढरपूरच्या दिशेने रवाना होऊ लागल्यात. प्रत्येक भक्ताच्या मनात भगवंताची सेवा आपल्या हातून घडावी अशी इच्छा असते. अशीच इच्छा ठेवून बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात शंभर महिलांनी एकत्र येत पाटोदा तालुक्यात येणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालकांची (Sant Eknath Maharaj Palkhi ) सेवा अनोख्या पद्धतीने करण्यासाठी वेगळी पद्धत वापरती आहे. नेमकी काय आहे ही सेवा पाहूयात या रिपोर्टमधून.  शबरीची उष्टी बोर श्री प्रभू श्रीरामाने गोड मानून सेवा केल्याची आख्यायिका आहे याच प्रमाणे पाटोद्यातील 70 वर्षीय आजीबाई कल्पना संचिती यांनी एक अनोखा भक्तिमय उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या संपर्कातील जवळपास शंभर महिलांची महिना केवळ पाच रुपयांची बचत भिशी सुरू केली आहे. या बचतीच्या रकमेतून पाटोदा येथे मुक्कामी येणाऱ्या नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी चहापान व फराळाची व्यवस्था केली जाणार आहे. वाचा : मुलांनो, करिअर इथंही चांगलंय! मुंबई विद्यापीठाकडून ‘पाली’चे 7 कोर्सेस सुरू; कसा कराल अर्ज? VIDEO कल्पना संचिती या मूळच्या पाटोदा तालुक्यातील धनगर जवळा या गावाच्या रहिवासी आहेत. पूर्वीपासूनच त्यांची अध्यात्माकडे ओढ आहे. पाटोदा तालुक्यात दरवर्षी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची पालखी मुक्कामी असते या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी असतात. यंदा पालखी 27 जून रोजी पाटोद्यात मुक्कामी येणार आहे. कल्पना संचेती यांच्या मनात आले की, आपल्या कडूनही पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी. यासाठी त्यांनी काही सहकारी मैत्रीणीसह वारकऱ्यांची सेवा करण्याचे ठरवले. यासाठी कल्पना संचित यांनी पाच रुपये महिना भिशी बचतीची कल्पना सुचली. कधी केली या उपक्रमाची सुरुवात? गुढीपाडव्याच्या मुहूर्त साधून कल्पना संचेती व त्यांच्या सहकारी कुसुम गायकवाड, राजश्री नागरगोजे, मीरा बांगर, पुष्पा बांगर, राजश्री जायभाये, अनुराधा नागरगोजे, मनीषा सानप, प्रतिभा तांबडे, कविता बिडवे व इतर अशा शंभर महिलांनी एकत्रीत येत महिन्याला केवळ पाच रुपयांची बचत भिशी सुरू केली. वाचा : MH BOARD SSC RESULT: निकाल तर लागला! पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स "वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा" 27 तारखेला पाटोद्यात संत एकनाथ यांची पालखी मुक्कामाला येणार आहे. या पालखीमध्ये हजार पेक्षा जास्त भाविक भक्त येत असतात. पालखीतील भाविकांची सेवा म्हणून चहापाणी आणि फराळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पांडुरंगाची सेवा हातून घडावी याची सर्वांनाच इच्छा असते. मात्र जरी आम्ही पंढरपुरला जाऊ शकलो नाही तरी आमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा घडत आहे. हे आमचं भाग्य आहे आम्ही हा उपक्रम कायम चालू ठेवणार असल्याचे कल्पना संचेती यांनी सांगितले,  पालखीचे दुसरे रिंगण पाटोद्या राज्यभरातील वारकरी पालख्यांमध्ये सहभागी होतात. एकनाथ महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण 28 जून रोजी दुपारी पाटोदा तालुक्यात होणार आहे. त्यानंतर ही पालखी पूढे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.  
    First published:

    Tags: Beed news, Wari

    पुढील बातम्या