मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मार्च एंडिंग वसुलीच्या नावाखाली पोलिसांची गुंडगिरी, व्हायरल व्हिडीओने खळबळ

मार्च एंडिंग वसुलीच्या नावाखाली पोलिसांची गुंडगिरी, व्हायरल व्हिडीओने खळबळ

मार्च एंडची सक्तीची वसुली करण्याच्या नावाखाली पोलिसांकडून चक्क बीड शहरात पोलिसांचा मुजोर कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मार्च एंडची सक्तीची वसुली करण्याच्या नावाखाली पोलिसांकडून चक्क बीड शहरात पोलिसांचा मुजोर कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मार्च एंडची सक्तीची वसुली करण्याच्या नावाखाली पोलिसांकडून चक्क बीड शहरात पोलिसांचा मुजोर कारभार चव्हाट्यावर आला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Maharashtra, India

बीड,30 मार्च : मार्च एंडची सक्तीची वसुली करण्याच्या नावाखाली पोलिसांकडून चक्क बीड शहरात पोलिसांचा मुजोर कारभार चव्हाट्यावर आला आहे. चार चाकीमधील तीन व्यक्तीना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे दंड नंतर भरू न्यायालयामध्ये जाऊन भरतो असे सांगण्यात आले. तरीही पोलिसांनी ऐकले नाही यानंतर कारमधील नागरीक आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यात पोलिसांनी चक्क नागरीकांना मारहाण केली.

दरम्यान मारहाण करतानाचा व्हिडिओ  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे पोलिसांच्या वसुली विरोधात सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. गाडी अडविल्याचा राग मनात धरून पोलिस निरीक्षकांना शिवीगाळ केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवण्यासाठी तब्बल 960 वेळा दिली परीक्षा; 18 वर्षांपूर्वीची बातमी पुन्हा व्हायरल

दरम्यान, सीसीटीव्ही तपासा,आपण मारहाण केलेली नसून पोलिसांनीच आपल्याला धक्काबुक्की केल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र मार्चच्या नावाखाली पोलिसांकडून चौका चौकात वाहने आढळून नागरिकांना त्रास दिला जात आहे तसेच कोर्टामध्ये जाऊन दंड भरून म्हटल्यानंतर देखील आरेरावेची भाषा केली जात असल्याचा देखील नागरिकांमधून सांगितलं जात आहे.

छत्रपती संभाजी नगरमधील धक्कादायक घटना, राम मंदिराबाहेर गाड्यांची जाळपोळ

मार्च एंड वसुलीच्या नावाखाली पोलिसांची गुंडगिरी.. भर चौकात नागरिकांना मारहाण बेदम मारहाण करण्यात आली. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ही धक्कादायक घटना आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांकडूनच धक्काबुक्की आणि मारहाण होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांकडून प्रवाशांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी काय कारवाई होते हे पहावे लागेल.

First published:
top videos

    Tags: Beed, Beed news, Local18