मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बीडमध्ये 7 अधिकारी, 70 पोलिसांना तपासात मोठं यशं, धाडसी दरोडा टाकणाऱ्या नराधमांचा पापाचा घडा भरला, थरारक तपास

बीडमध्ये 7 अधिकारी, 70 पोलिसांना तपासात मोठं यशं, धाडसी दरोडा टाकणाऱ्या नराधमांचा पापाचा घडा भरला, थरारक तपास

धाडसी दरोडा टाकणाऱ्या नराधमांचा पापाचा घडा भरला

धाडसी दरोडा टाकणाऱ्या नराधमांचा पापाचा घडा भरला

बीडमध्ये एका प्रस्थ व्यक्तीच्या घरात धाडसी दरोडा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबणाऱ्या आणि घरातल्यांना मारहाण करत जखमी करणाऱ्या नराधमांचा अखेर पापाचा घडा भरला आहे.

बीड, 12 ऑगस्ट : आपली नीती चांगली हवी, असं म्हणतात. मेहनत करायची, आयुष्यात यश संपादीत करायचं आणि आपल्याला हवं तसं आयुष्य जगायचं. पण काही लोक शॉर्टकटपणे मोठं होण्याचं स्वप्न पाहतात. त्यांना कमी वेळात मोठं व्हायचं असतं, पैसे कमवायचं असतं. त्यामुळे अशी माणसं काहीवेळा अराजकतेचा मार्ग निवडतात. नको ते कृत्य करतात. दुसऱ्याची मेहनतीचे पैसे ओराबाडून घेण्याचा प्रयत्न करतात. नको असलेल्या अराजकतेच्या मार्गावर जावून अतिशय वाईट कृत्य करतात. पण त्यांच्या कूकृत्यांचा कधीनाकधी घडा भरतोच आणि त्यांना योग्य शासन होतं. तशीच काहीशी घटना बीडमध्ये बघायला मिळाली आहे. बीडमध्ये एका प्रस्थ व्यक्तीच्या घरात धाडसी दरोडा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबणाऱ्या आणि घरातल्यांना मारहाण करत जखमी करणाऱ्या नराधमांचा अखेर पापाचा घडा भरला आहे. पोलिसांनी या आरोपींना शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा केली होती. दरोडेखोरांच्या या टोळीला पकडण्यासाठी तब्बल 70 पोलीस कर्मचारी कामाला लावले होते. अखेर आरोपींपैकी दोघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. गेल्या आठवडाभरापूर्वी बीड तालुक्यातील वडवाडी गावात बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अभिमान अवचार यांच्या घरात सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करत लाखो रुपये आणि पाच तोळे सोने लंपास केले होते. या प्रकरणात बीड पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रयत्न सुरु आहे. बीड आणि उस्मानाबाद पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. (सुनेने आधी सासू..मोठा दीर..जाऊ अन् पुतणीची केली हत्या; राखीपौर्णिमेला घरात पडला मृतदेहांचा सडा) या दरोड्याचा छडा लावण्याकरिता सात अधिकारी आणि 70 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे या धाडसी दरोड्यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यांचा शोध देखील सुरू आहे. या संदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दरम्यान गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याच्या घटना देखील घडत आहेत. त्यामुळे आरोपींना कायद्याचा धाक उरला आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेमकं काय घडलं होतं? बीडच्या वडवाडी गावात बंदुकीचा धाक दाखवून 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. यावेळी दरोडेखोरांनी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांचं कार्यालय आणि घरी धाडसी दरोडा टाकून पती-पत्नीला बेदम मारहाण करत 9 लाख रुपये रोख आणि 5 तोळे सोने चोरून नेले होते. ही घटना गेल्या आठवड्यात मध्यरात्रीच्या दरम्यान घडली होती. या भयानक आणि धाडसी चोरीच्या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेतील आरोपी चोर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. बीड तालुक्यातील वडवाडी येथे बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांचे घर आणि कार्यालय आहे. मध्यरात्री 8 ते 10 दरोडेखोरांनी अवचर यांच्या घरी आणि कार्यालयावर दरोडा टाकला. यावेळी बंदुकीचा धाक दाखवून तब्बल 9 लाख रुपयांच्या रोकडीसह 5 तोळे सोने पळविले. या घटनेने वडवाडीच्या बालाघाट परिसरात एकच खळबळ उडाली होती. संबंधित घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांसह एलसीबीच्या अधिकारी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पहाणी केली. यावेळी श्वानपथकाला देखील पाचारण करत पहाणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस चांगलेच कामाला लागले होते.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Beed, Beed news, Crime, Robbery

पुढील बातम्या