मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अरे बापरे! फक्त राखेसाठी सारं काही, बीडमध्ये मोठा स्फोट घडवण्याचा कट उधळला, धक्कादायक माहिती समोर

अरे बापरे! फक्त राखेसाठी सारं काही, बीडमध्ये मोठा स्फोट घडवण्याचा कट उधळला, धक्कादायक माहिती समोर

बीडमध्ये मोठा स्फोट घडवण्याचा कट उधळला

बीडमध्ये मोठा स्फोट घडवण्याचा कट उधळला

बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्राला अवैध राख माफीयांचे ग्रहण लागले आहे. त्यातूनच परळीच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बीड, 28 ऑगस्ट : बीडमध्ये आज सकाळी स्फोटासाठी लागणाऱ्या जिलेटीनच्या काड्या आणि अनेक वस्तू जप्त करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपींनी राखेसाठी स्फोटाचा प्लॅन आखला होता. विशेष म्हणजे ज्या भागात स्फोट घडवून आणला जात होता त्या परिसराजवळच विद्यूत केंद्र आहे. त्यामुळे कदाचित फार मोठा विध्वंस होण्याचा धोका होता. अखेर स्फोट होण्याआधीच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याने मोठा अनर्थ टळला आहे. बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्राला अवैध राख माफीयांचे ग्रहण लागले आहे. त्यातूनच परळीच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरात स्फोटासाठी लागणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या, तोटे आणि बॅटरी असे साहित्य जप्त केल्यानंतर परळीमधील नागरिकांनी मोठी भीती व्यक्त केलीय. राखीने श्वास गुदमरत होता आता भीतीने गुदमरत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. नेमकं प्रकरण काय? बीडच्या परळीतील औष्णिक विद्युत केंद्र असणाऱ्या थर्मलच्या परिसरामध्ये, राख साठवण्यासाठी स्फोटाचा कट आखण्यात आला होता. हा कट सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे परळी ग्रामीण पोलिसांनी उधळून लावलाय. यावेळी पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेत, थर्मल परिसरात राखेचं काम करणाऱ्या 3 कामगारांना अगोदर ताब्यात घेतलं. त्या आरोपींकडे 103 जिलेटीनच्या कांड्या, 150 तोटे, 3 बॅटरी आणि वायर मिळाली आहे. दरम्यान पकडलेल्या 3 आरोपींना आज न्यायालयात हजर केलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या घटनेमुळे परळी परिसरात खळबळ उडाली आहे. (मळमळ होतंय म्हणाला, आरोपी पोलिसांना जोरात हिसका देऊन पळाला, बीडमधील धक्कादायक घटना) अवैध राख वाहतूक थांबवावी, परळीकरांची मागणी राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळी शहरात राख माफियांमुळे नागरिकांचं जगणं कठीण झालं आहे. या अगोदर असुरक्षित राखेच्या वाहतुकीमुळे अपघात होवून अनेक निष्पाप नगरिकांचे बळी गेले आहेत. तर अनेकांना कायमस्वरूपीचे श्वसनाचे आणि डोळ्याचे आजार जडले आहेत. इथले नागरीक राखेची समस्या सोडवा, अशी मागणी अनेक वर्षापासून करत आहेत. मात्र मातब्बर नेत्यांकडूनही याकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष केले गेले. यामुळेच राख माफीयांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे तात्काळ अवैध राख वाहतूक थांबवावी, अशी मागणी सामान्य परळीकर करत आहेत. 'संवेदनशील ठिकाणी जिलेटीन आलीच कशी?' दरम्यान, त्या ठिकाणी जिलेटीन आलीच कशी? एवढ्या संवेदनशील भागात असे प्रकार होत असतील तर शासनाने यावर प्रतिबंध घालावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ .संतोष मुंडे यांनी केली. अगोदरच परळीकरांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातच अशा पद्धतीचे धक्कादायक प्रकार समोर येत असल्यामुळे नागरिकांना परळीत जीव मुठीत धरून राहावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया संतोष मुंडे यांनी दिली. 'घाबरु नका', नागरिकांना आवाहन "परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख तळ्यात काही अज्ञात व्यक्ती राख मोकळी करण्याकरिता स्फोटके आणल्याची खबर मिळताच केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी 3 व्यक्ती ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले. त्यामूळे परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नाही. राखेच्या ठिकाणाहून औष्णिक वीज निर्मिती केंद्र अडीच किलोमीटर अंतरावर आहे. या घटनेमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे सुरक्षा कर्मचारी चोख कर्तव्य बजावत आहे", असे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी फोनवरून सांगितले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींना आज न्यायालयात हजर केलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या आरोपींची कसून चौकशी केली जाणार असल्याचं पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी फोनवरून सांगितलं. मात्र घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अगोदर राखेच्या प्रदूषणाचा सामना करणाऱ्या परळीकरांची राख माफीयांपासून सुटका केली जावी, अशी मागणी होत आहे.
First published:

Tags: Beed, Beed news

पुढील बातम्या