मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रोजच्या सवयीने घात केला, बीडच्या दाम्पत्याचा धक्कादायक शेवट, पहाटे 4 वाजता उठले अन्...

रोजच्या सवयीने घात केला, बीडच्या दाम्पत्याचा धक्कादायक शेवट, पहाटे 4 वाजता उठले अन्...

बीडच्या घोळवे पिंपळगावात एका दाम्पत्याचा करुण अंत झाला आहे. बायकोला वाचवायला गेलेल्या वृद्ध नवऱ्याचा धक्कादायक शेवट झाला आहे, यामध्ये पत्नीलाही जीव गमवावा लागला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid, India
  • Published by:  Shreyas

बीड, 25 जानेवारी : बीडच्या घोळवे पिंपळगावात एका दाम्पत्याचा करुण अंत झाला आहे. पाणी तापवण्यासाठी हिटर लावताना करंट लागून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, यामुळे केज तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे आणि इंदूबाई सुरवसे असं मयत पती-पत्नीची नावं आहेत. ज्ञानेश्वर सुरवसे हे 50 वर्षांचे तर इंदूबाई सुरवसे 45 वर्षांच्या होत्या.

आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमासार इंदूबाई यांना जाग आल्यानंतर त्या पाणी तापवण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांनी हिटर बकेटमध्ये टाकला, यानंतर त्यांना करंट लागला. हा प्रकार त्यांचे पती ज्ञानेश्वर यांच्या लक्षात आला, त्यानंतर ते पत्नीला वाचवण्यासाठी गेले, पण त्यांनाही करंट लागला आणि दोघांचाही मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले आहेत.

First published: