सुरेश जाधव, 25 फेब्रुवारी : बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचे इच्छे विरुद्ध लग्न लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान यानंतर मुलीने सासरी नांदण्यास नकार दिल्याने माहेरच्या मंडळीनी अज्ञात स्थळी सोडून गेल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. या बालविवाह प्रकरणी मुलीचे आई-वडील, आजोबा, मामा, सासू, सासरा, पती यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : आयुष्यभर साथ दिली अन् 2 दिवसांपूर्वीच सोडून गेली, शेतकऱ्याला झाले नाही सहन अन्...
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह ( दि. 16) फेब्रुवारी पार पडला. या बालविवाहात काही अडचण येऊ नये म्हणून मुलगीला अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात देण्यात आलं. तर विवाह केज तालुक्यातील मामाच्या गावी शेतात लावून देण्यात आला.
दरम्यान त्या मुलीने सासरच्या मंडळींला मला विवाह मान्य नाही. मी येथे रहाणार नाही. असे स्पष्ट सांगितले. त्यांनी ही माहिती माहेरी दिली. माहिती मिळताच वडील, आजोबा आणि मामांनी औरंगाबाद गाठून अल्पवयीन वधूला एका वाहनात बसवून अज्ञात स्थळी सोडून दिले. एका महिलेला हा प्रकार मुलीने सांगितला असता तिने मदत करत मुलीला पोलीस ठाण्यात सोडले.
हे ही वाचा : आईचा अपघाती मृत्यू; घट्ट मिठी मारून बसलेलं माकडाचं पिल्लू झालं भावुक, VIDEO पाहून येईल डोळ्यात पाणी
सदरील अल्पवयीन वधूने पोलिसांना हकीकत सांगितली असता दौलताबाद जिल्हा संभाजीनगर पोलीसांनी माहिती युसुफ वडगाव पोलीसांना दिली. येथे आई-वडील , आजोबा, मामा, पती, सासु ,सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Crime news