मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed Lumpy Skin Disease : बीड जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगाने शेतकरी हैराण; आतापर्यंत 3 जनावरांचा बळी

Beed Lumpy Skin Disease : बीड जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगाने शेतकरी हैराण; आतापर्यंत 3 जनावरांचा बळी

बीड जिल्ह्यात जनावरांमध्ये आलेल्या लम्पी स्कीन संसर्गजन्य आजाराने पशुपालक शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील 110 गावांमध्ये लम्पी स्कीन या रोगाने शिरकाव केला आहे. (Beed Lumpy Skin Disease)

बीड जिल्ह्यात जनावरांमध्ये आलेल्या लम्पी स्कीन संसर्गजन्य आजाराने पशुपालक शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील 110 गावांमध्ये लम्पी स्कीन या रोगाने शिरकाव केला आहे. (Beed Lumpy Skin Disease)

बीड जिल्ह्यात जनावरांमध्ये आलेल्या लम्पी स्कीन संसर्गजन्य आजाराने पशुपालक शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील 110 गावांमध्ये लम्पी स्कीन या रोगाने शिरकाव केला आहे. (Beed Lumpy Skin Disease)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

बीड, 27 सप्टेंबर : बीड जिल्ह्यात जनावरांमध्ये आलेल्या लम्पी स्कीन संसर्गजन्य आजाराने पशुपालक शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील 110 गावांमध्ये लम्पी स्कीन या रोगाने शिरकाव केला आहे. तर या 110 गावांमधील 262 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लंम्पीने आतापर्यंत तीन जनावरांचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. मृत जनावरांचे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आली अशल्याची माहिती देण्यीत आली आहे.

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या राजेवाडी परिसरात, एक गावरान गाय व एक गोन्हा दगावला आहे. तर आष्टी तालुक्यात एका संकरित कालवडीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजेवाडी येथे जनावरांत लम्पी लक्षणे आढळल्याचे समजल्यानंतर पशुधनविकास अधिकाऱ्यांनी उपचार केले आहेत. दरम्यान दुसऱ्या दिवशी गाय व गोन्हा मृत झाल्यानंतर ते शेतकऱ्याने पुरले व त्यानंतर पशुसंवर्धन विभागाला कळविले. दुसरीकडे आष्टी तालुक्यातील संकरित कालवडीचे लसीकरण केले होते. परंतु लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने कालवड मृत झाले आहे.

हे ही वाचा : Jalgaon Crime : जळगाव सुन्न करणारी घटना मुलाने केली सावत्र आईची हत्या, कारण ऐकून धक्का बसेल

दरम्यान जनावरांमध्ये लक्षणे आढळल्यास तात्काळ त्यांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करुन इतरत्र ठेवावे. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाला कळवावे. रोगी व निरोगी जनावरे एकत्रित चराईसाठी सोडू नयेत. गोठ्यातील डास, माश्या, गोचिड यांचे निमुर्लन करावे. वेळोवेळी कीटकनाशकांचा वापर करावा, गोठा कोरडा, स्वच्छ, निर्जंतुक ठेवावा. अडगळीच्या जागा, सांडपाणी ठिकाणे, शेण, मलमूत्र यांचे व्यवस्थापन करावे. असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

लम्पी स्किन डिसीज म्हणजे काय?

युरोपीयन अन्न सुरक्षितता प्राधिकरण अर्थात ईएफएसएने (EFSA) दिलेल्या माहितीनुसार, लम्पी स्किन डिसीज हा एक विषाणूजन्य रोग असून, तो जनावरांना होतो. या आजाराचा प्रसार माश्या, डास, गोचीड यांसारख्या कीटकांद्वारे होतो. एलएसडी हा लम्पी स्किन डिसीज व्हायरसमुळे होतो. हा पॉक्सिव्हिरिडी कुळातला कॅप्रीपॉक्सव्हायरस आहे, अशी माहिती वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ अर्थात डब्ल्यूओएएचने दिली आहे.

या आजाराची लक्षणं कोणती?

लम्पी स्किन डिसीजमुळे जनावरांमध्ये ताप, त्वचेवर गाठी, डोळे आणि नाकातून स्राव, दूध उत्पादन कमी होणं आणि आहार घेण्यात अडचण निर्माण होणं ही लक्षणं दिसतात. विशेषतः ज्या जनावरांना यापूर्वी विषाणूचा संसर्ग झालेला नाही, त्यांच्यासाठी हा विषाणूजन्य संसर्ग घातक ठरू शकतो. या आजारामुळे गाभण गायी आणि म्हशींचा गर्भपात होतो.

हे ही वाचा : Chrome Alert: गुगल क्रोम वापरत असाल तर सावधान, बँक खातं होऊ शकतं रिकामं

या आजारामुळे मानवाला धोका आहे का?

`डब्ल्यूओएएच`च्या म्हणण्यानुसार, या आजाराचा मानवाला धोका नाही. कारण हा आजार झूनॉटिक नाही. याचा अर्थ तो जनावरांपासून मानवामध्ये पसरत नाही आणि माणसाला या विषाणूचा संसर्ग होऊ शकत नाही.

First published:

Tags: Beed, Beed news, Farmer, Pet animal