मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बायको हरवल्याची तक्रार नवऱ्याला पडली महागात, पोलीस स्टेशनला गेला अन् स्वत:च अडकला, बीडमध्ये खळबळ

बायको हरवल्याची तक्रार नवऱ्याला पडली महागात, पोलीस स्टेशनला गेला अन् स्वत:च अडकला, बीडमध्ये खळबळ

एका व्यक्तीला आपली बायको हरवल्याची तक्रार देणं चांगलचं महागात पडलंय. तक्रार दिल्यानंतर तपासाअंती चक्क तक्रारदार पतीसह 10 जणांच्या हातात बेड्या पडल्या आहेत.

एका व्यक्तीला आपली बायको हरवल्याची तक्रार देणं चांगलचं महागात पडलंय. तक्रार दिल्यानंतर तपासाअंती चक्क तक्रारदार पतीसह 10 जणांच्या हातात बेड्या पडल्या आहेत.

एका व्यक्तीला आपली बायको हरवल्याची तक्रार देणं चांगलचं महागात पडलंय. तक्रार दिल्यानंतर तपासाअंती चक्क तक्रारदार पतीसह 10 जणांच्या हातात बेड्या पडल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid, India

बीड, 2 फेब्रुवारी : एखाद्या व्यक्तीने आपल्या कुटुंबातील व्यक्ती हरवल्याची तक्रार दिली तर त्यांना ती व्यक्ती मिळाल्याच्या घटना, बातम्या पाहिल्या असतील. मात्र एका व्यक्तीला आपली बायको हरवल्याची तक्रार देणं चांगलचं महागात पडलंय. तक्रार दिल्यानंतर तपासाअंती चक्क तक्रारदार पतीसह 10 जणांच्या हातात बेड्या पडल्या आहेत.

बीडच्या धारूर पोलीस ठाण्यात शहरातील कृष्णा शेटे वय 34 वर्ष या विवाहित तरुणाने तक्रार दिली, की माझी 19 वर्षीय पत्नी हरवली आहे. तीचा आम्ही शोध घेतला , मात्र आम्हाला ती मिळून आली नाही. त्यामुळे तिचा तपास करावा, अशी फिर्याद पतीने दिली होती. त्यानंतर धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, विजय आटोळे यांनी तपासाला गती देत शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान कृष्णा शेटे यांची पत्नी अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री येथे परळीच्या रोहित लांबूटे या तरुणासोबत सापडली. त्यानंतर पोलिसांनी विवाहितेसह तिच्यासोबत असणाऱ्या रोहित लांबूटेला धारूर पोलीस ठाण्यात आणलं. चौकशी केली असता ती स्वतःहून रोहित लांबूटे याच्यासोबत गेल्याचं तिने सांगितलं.

तपास करत असताना पोलिसांना संबंधित विवाहितेचे वय कमी असल्याचा संशय आल्याने, तिच्या आधार कार्डची तपासणी करण्यात आली. यावेळी त्या आधार कार्डवर तिची जन्मतारीख 24 एप्रिल 2008 असून ती अल्पवयीन असल्याचं समोर आलं. तर याविषयी पोलिसांनी विवाहितेच्या शाळेत जाऊन चौकशी केली, असता ती केवळ 14 वर्ष 9 महिन्याची असल्याचं समोर आलंय.

दरम्यान ही माहिती समोर येतात धारूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी, दीक्षा चक्रे यांच्या फिर्यादीवरून, बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये, 34 वर्षीय पती कृष्णा शेटे याच्यासह, बालविवाह लावून देणारे अल्पवयीन विवाहितेच्या मामा-मामी, आई-वडील, भाऊ तर पती असणाऱ्या कृष्णा शेटे याच्या आईसह नातेवाईकांवर, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान बायको हरवल्याची तक्रार द्यायला गेला अन् बालविवाहाचा गुन्ह्यात अडकला असा प्रकार कृष्णा शेटे यांच्या बाबतीत घडला आहे. कृष्णा शेटे याने बायको हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र माहिती असूनही अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याचे त्याने लपवून ठेवले. यामुळे तक्रार द्यायला गेले अन् आरोपी बनले, अशी गत कृष्णा शेटे यांची झाली आहे. तर विवाहितेसोबत सापडलेल्या रोहित लांबूटे याच्या विरोधात तक्रार नसल्याने तो अलगद बाजूला निघाला आहे. दरम्यान या सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी चाइल्डलाईनचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी केलीय.

बायको हरवल्याची तक्रार देणं पती असणाऱ्या कृष्णा शेटेला चांगलंच महागात पडलंय. अल्पवयात मुलीचे हात पिवळे करणाऱ्या 10 व्यक्तींच्या हातात पोलिसी बेड्या पडल्या. यामुळे या बालविवाहाची अनोखी चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे. तर बीड जिल्ह्यात मागच्या वर्षात 88 बालविवाह सामाजिक कार्यकर्त्यांनी रोखले आहेत, पण शेकडो बालविवाह चोरीछुपे पद्धतीने झाले आहेत. बालविवाहाची गंभीर समस्या थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

First published:

Tags: Crime news