रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 26 मे: बीड जिल्ह्यातील शेतकरी हा नेहमी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असतो. आता जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. बीडजिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने यावर्षी देखील शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. कापसाची तोडणी होऊन सहा ते सात महिने उलटले आहेत. मात्र बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या घरातच कापूस साठवून ठेवला आहे.
शेतकऱ्यांसमोर प्रश्न
गती वर्षी कापसाला 12 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आणि कापसाला चांगला दर मिळून वर्षाखाली चांगले उत्पन्न हाती येईल असे अपेक्षा ही बळीराजाला होती. मात्र, कापूस वेचनी होऊन आता सहा ते सात महिने उलटले तरी कापसाला बाजारात योग्य भाव मिळत नाहीये. त्यामुळे कापूस लागवड करून कुठेतरी चूक केली का असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय आहे.
खर्च निघणं अवघड
बीड पासून अवघ्या काही किलोमीटर असणाऱ्या जिरेवाडी गावातील बाबासाहेब भोगल या शेतकऱ्याने त्यांच्या जवळपास दीड एकर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. एकूण त्यांना दोन एकर क्षेत्र एवढंच शेत आहे. गतीवर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यावर्षी कापसाच्या माध्यमातून हाती उत्पन्न चांगले येईल म्हणून या अपेक्षाने त्यांनी कापसाची लागवड केली. मात्र आता सात महिने उलटूनही त्यांचा कापूस घरातच पडून आहे. कापसाला लागवडीसाठी केलेला खर्च देखील त्यांचा निघणं आता अवघड झाले आहे. त्यामुळे कापसाची जर आता विक्री नाही झाली तर हा कापूस फेकून दिल्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही, असं बाबासाहेब भोगल सांगतात.
Beed News: महाराष्ट्राचं राज्य फूल पाहिलंत का? PHOTOS
शेतकरी चिंतेत
नोव्हेंबर महिन्यात 9 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल भाव गेला होता. मात्र कापसाचा भाव दिवसेंदिवस घसरत गेला महिन्याभरात तब्बल दीड हजार रुपयांनी कापसाचे भाव कोसळल्याने शेतकऱ्याचे पांढरं सोनं आता सात हजाराच्या खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र ज्यावेळी कापसाचा भाव 9 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल गेला होता. त्यावेळी कापसाचा दर आणखीन वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनी कापूस हा घरातच ठेवला मात्र आता कापसाचा दर हा घसरत असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.