मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed farmers : शेतकऱ्यांचे संकट काही कमी नाही, खरिपाच्या पिकांवर किडीचा परिणाम रानच्या रानं झाली रिकामी

Beed farmers : शेतकऱ्यांचे संकट काही कमी नाही, खरिपाच्या पिकांवर किडीचा परिणाम रानच्या रानं झाली रिकामी

बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकांवर मोठा परिणाम होत आहे. पाऊस सुरू झाल्याने किडीचे साम्राज्य वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकांवर मोठा परिणाम होत आहे. पाऊस सुरू झाल्याने किडीचे साम्राज्य वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकांवर मोठा परिणाम होत आहे. पाऊस सुरू झाल्याने किडीचे साम्राज्य वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई, 14 जुलै : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून चांगला पाऊस झाल्याने पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. बियाणेही उगवू लागले आहेत. बीड जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन व कापूस लागवडीवरच भर देत आहेत. पंरतु शेतकऱ्यांची पेरणीची चिंता मिटली असली तरी दुसरे संकट उभे ठाकले आहे. (Beed farmers)

बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकांवर मोठा परिणाम होत आहे. पूर्वी पाऊस नसल्याने अडचण होती, पाऊस सुरू झाल्याने किडीचे साम्राज्य वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारकने द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्र पाण्यात बुडाला, मुख्यमंत्री शिंदेंसह आमदार-खासदारांची स्नेहभोजन पार्टी!

खरीप हंगामाच्या पेरण्या आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रात पीके उगवू लागली आहेत. मात्र गोगलगायींच्या प्रमाणात वाढ झाल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे. त्याचा सामना कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मत आहे. सोयाबीन पिकाला गोगलगायीच्या प्रादुर्भावाचा फटका बसत आहे. उगवलेल्या पिके गोगलगाय ओरबडून खात आहेत.

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या

गोगलगायीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ले दिले आहेत. पण कृषी विभागाने दिलेले सल्ल्याला खूप उशीर झाला होता. यावर्षी शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत खरिपाची पेरणी केली होती. तोपर्यंत हे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून या शेतकऱ्यांना मदत देण्याचे सांगण्यात आले होते परंतु नवे सरकार आल्याने शेतकऱ्यांना मदत मिळणे कठीण असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : गुरुपौर्णिमा पडली भारी, तब्बल 19 तासांनंतर 15 भाविकांची सुटका, पाण्यातून काढली वाट!

शेतकऱ्यांसाठी उपाय काय?

पिकांचे बियाणे उगवताच किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. गोगलगायी पिकांचे देठ खात असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना शेत तणमुक्त ठेवण्याचा सल्ला देत आहे. यामुळे गोगलगायींना थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. याशिवाय गोगलगायी कमी करण्यासाठी साबण किंवा मीठ पाण्याने फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. परंतु उपायांमुळे गोगलगायींवर नियंत्रण येणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटे आले आहे.

First published:
top videos

    Tags: Beed, Beed news, Dhananjay munde, Farmer, Farmer protest