मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भय इथले संपत नाही! साडेतीन टन कांदा विकून हातात काहीच नाही; उलट 1832 खिशातून दिले

भय इथले संपत नाही! साडेतीन टन कांदा विकून हातात काहीच नाही; उलट 1832 खिशातून दिले

साडेतीन टन कांदा विकून हातात काहीच नाही

साडेतीन टन कांदा विकून हातात काहीच नाही

बीडच्या शेतकऱ्याने साडेतीन टन कांदा मार्केटला नेल्यानंतर त्याच्या हातात काहीच पैसे आले नाही. उलट त्यालाच 1832 रुपये आडत द्यावी लागली.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 20 मार्च : कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्या डोळ्यात पाणी आणले आहे. साडेतीन टन कांदा विक्री करून शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडले नाही. उलट अडत व्यापाऱ्याला 1800 रुयये देण्याची वेळ बीड मधील एका शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे 70 हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयाही पदरात न पडल्याने आम्ही जगावं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी भगवान डांबे यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली. महागाचे बियाणे, लागवडीचा खर्च, खुरपणी, फवारणी, खते आणि काढणीचा खर्च सगळं मिळून 70 हजार खर्च आला. कांदा देखील चांगला निघाल्याने चांगले उत्पन्न मिळेल असे स्वप्न भगवान यांनी पाहिले होते. कांद्याचा 120 गोण्या भरून सोलापूर मार्केटला पाठवला. चांगला भाव मिळेल त्यातून मुलांचे शिक्षण लग्न घर कुटुंब चालवता येईल असे स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिले होते. मात्र, कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात पडलेल्या पट्टी पाहून धक्काच बसला. कारण अडत व्यापाऱ्याने आणखी 1800 रूपये जमा करा म्हणून सांगितलं. गावाकडून पैशे मागवून घेतले. सगळे पैसे देऊन रिकाम्या हाताने शेतकरी घरी आला. त्यावेळी त्याच्या डोळ्यातील अश्रू आणि कुटुंब रात्रभर रडलं. आता कुटुंबाला जगवायचं कसं असा प्रश्न शेतकरी कुटुंबासमोर आहे, अशी परिस्थिती बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.

वाचा - pension strike : 7 दिवस महाराष्ट्राला वेठीस ठेवून सरकारी कर्मचाऱ्यांना काय मिळालं? मुख्यमंत्र्यांनी काय दिलं आश्वासन?

लेकरांनी काबाडकष्ट करून कांदा पिकवला. त्याला दिवस रात्र मेहनत केली. काढण्यासाठी मजूर मिळत नव्हते तर वयोवृद्ध असून त्यांना मदत करायला आले. खर्च खूप मोठा झाला. मात्र, त्याच्या हातात काहीच पडलं नाही. सोलापूरहून येताना भीक मागून दुसऱ्याकडून पैसे घेऊन माझे लेकरू आलं. आता इकडे तिकडे फिरत आहे. घर कसे चालवावे ही विवंचना त्याला सतावत आहे, असं पीडित भगवान डांबे यांच्या आईने सांगितलं. अशीच परिस्थिती या गावातील प्रत्येक शेतकऱ्याची आहे.

कांद्याच्या उत्पन्नातून माझं शिक्षण होईल अशी अपेक्षा होती. मात्र, कांद्याचे बिल आणि पट्टी पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. उलट अठराशे रुपये आडत व्यापाराला देऊन रिकाम्या हाताने परत यावं लागलं. साडेतीन टन कांदा त्यातून एक रुपया मिळाला नसेल तर आम्ही जगायचं कसं सांगा असा प्रश्न शेतकऱ्याच्या मुलाने उपस्थित केला.

First published:
top videos

    Tags: Beed, Farmer