बीड, 29 जानेवारी : बीडमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली होती. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील देवप्रिंप्री येथे घडली होती. एका व्यक्तीचा मृत्यूदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला होता. दरम्यान याप्रकरणी आत्महत्या की घातपात असा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणी गेवराई पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. बंडू सखाराम सुरनर (वय 50 वर्ष )असे मयताचे नाव आहे. गावातील काही लोकांनी माझ्या वडिलांना फाशी दिल्याचा आरोप मयताच्या मुलांनी केला होता.
देवप्रिंप्री येथील बंडू यांना गेल्या सात ते आठ दिवसापुर्वी गावातील काही लोकांनी त्यांना व त्यांच्या मुलाला घरात घुसून मारहाण केली होती. परंतू यांची फिर्याद गेवराई पोलिसांनी घेतली नाही. म्हणून याच नैराशातून त्यांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज नातेवाईक व्यक्त केला. मात्र पोलीस तपासात खून असल्याची पुष्टी पोलिसांना झाली. गेवराई पोलिसांत पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा : सामूहिक बलात्काराच्या घटनेनं नागपूर हादरलं; आरोपींनी मुलीला गाडीत बसवलं अन,..
बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना
बीडच्या घोळवे पिंपळगावात एका दाम्पत्याचा करुण अंत झाला आहे. पाणी तापवण्यासाठी हिटर लावताना करंट लागून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, यामुळे केज तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे आणि इंदूबाई सुरवसे असं मयत पती-पत्नीची नावं आहेत. ज्ञानेश्वर सुरवसे हे 50 वर्षांचे तर इंदूबाई सुरवसे 45 वर्षांच्या होत्या.
आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमासार इंदूबाई यांना जाग आल्यानंतर त्या पाणी तापवण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांनी हिटर बकेटमध्ये टाकला, यानंतर त्यांना करंट लागला. हा प्रकार त्यांचे पती ज्ञानेश्वर यांच्या लक्षात आला, त्यानंतर ते पत्नीला वाचवण्यासाठी गेले, पण त्यांनाही करंट लागला आणि दोघांचाही मृत्यू झाला.
हे ही वाचा : 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत पोलिसाचा बालविवाह! इच्छेविरुद्ध शरीरसंबंध अन्.. बीड हादरलं
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.