सुरेश जाधव (बीड), 12 फेब्रुवारी : लग्नाळू तरुणांची बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीची मास्टरमाईंड पूजा कचरू निलपत्रेवार प्रसूतीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. मात्र, प्रसूतीआधीच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला अंमलदारांला चकामा देवून पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
डिसेंबर महिन्यात बीडमधील अडीच लाख रुपये देऊन वसमत येथे मुद्रांकावर लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. यात 11 आरोपींचा सहभाग आढळला होता. यात पूजा ही मुख्य आरोपी आहे.
बीड जिल्हा रुग्णालयातून पलायन करणारी पूजा लग्नाळू तरुणांच्या फसवणुकीचे गुन्हे करणारी सराईत आरोपी आहे. बीड शहर, नेकनूर, बैठाणा ठाण्यातील गुन्ह्यात तिला अटक झालेली आहे. पैठण औरंगाबाद ठाण्यातही तिच्यासह पती कचरूलाल तुळशीराम निलपत्रेवार याच्यावर गुन्हा नोंद आहे. परभणीतील एका अभियंत्याला तिने पाच लाखांना चुना लावल्याचा तिच्यावर आरोप आहे.
हे ही वाचा : धक्कादायक! पती चक्क मित्र आणि प्राण्यांशी संबंध ठेवायचा, पत्नीन व्हॉट्सअॅप चॅट पाहिल अन्...
प्रसूतीसाठी कारागृहातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून ती स्वच्छतागृहाकडे गेली व तेथून तिने पलायन केले. यावेळी दोन महिला अंमलदार सुरक्षेसाठी नेमल्या त्यांना चकमा देवून धूम ठोकली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Crime news