Home /News /maharashtra /

Beed Accident : रुग्णाला सुखरुप सोडले पण रुग्णवाहिकेच्या चालकाला मृत्यूने गाठले

Beed Accident : रुग्णाला सुखरुप सोडले पण रुग्णवाहिकेच्या चालकाला मृत्यूने गाठले

बीडच्या परळी - गंगाखेड महामार्गावर, (Beed parli gangakhed highway) रुग्णवाहिका पलटी होऊन अपघात झाला आहे. (Ambulance accident)

  बीड, 13 जुलै : बीडच्या परळी - गंगाखेड महामार्गावर, (Beed parli gangakhed highway) रुग्णवाहिका पलटी होऊन अपघात झाला आहे. (Ambulance accident) परळीच्या दगडवाडीजवळ झालेल्या या रुग्णवाहिकेच्या अपघातात, चालक जागीच ठार झाला. गजानन चिलगर असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना आज (दि.13) सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान घडली आहे. रुग्णाला सुखरुप सोडले पण रुग्णवाहिकेच्या चालकाला मृत्यूने गाठले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Beed accident)

  ‌‌पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथील रुग्णवाहिका एका रुग्णाला अंबाजोगाई येथे सोडून परत गंगाखेडकडे जात होती. यादरम्यान दगडवाडीजवळील चढावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, रुग्णवाहिका रस्त्याच्याकडेला पलटी झाली. यामध्ये रुग्णवाहिकेचा चालक गजानन हा जागीच ठार झाला. दरम्यान परळी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

  हे ही वाचा : Farmer Protest : शेतकऱ्यांची लुबाडणूक बोगस बियाणे खते विकणाऱ्यांवर कारवाई करूनही बियाणे, खते विक्री

  एकाच दिवशी बीडमध्ये अपघाताच्या दोन घटना

  बीडच्या केज - कळंब महामार्गावर ट्रक आणि बोलेरो जीपचा भीषण अपघात झाला.या अपघातात जीपच्या चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर बोलेरोचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. हा अपघात बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या साळेगाव परिसरात झाला.

  हे ही वाचा : Sangli : लाट आली अन् दोघांना समुद्रात घेऊन गेली, 'त्या' व्हायरल व्हिडीओतील माणसं सांगलीची, LIVE VIDEO

  साळेगाव परिसरात बोलेरो जीप (MH-20/DJ- 9563) या गाडीला ऊस बगॅसची वाहतूक करणाऱ्या ट्रक (MH-09/CA-4590) ने समोरून जोराची धडक दिली. यात बोलेरो जीप चालक सोनू अन्सारी शेख (वय 25) नशीर बशीर शेख (वय 36) दोघे रा. थेटेगव्हाण ता. धारूर हे गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित जखमींवर अंबाजोगाई आणि लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान ट्रक चालक रविंद्र महादेव रुपनर रा. नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर याच्यासह अपघातातील ट्रक केज पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Accident, Beed, Beed news, Major accident

  पुढील बातम्या