मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : चाईल्ड पोर्नोग्राफी, सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांनाच प्रशिक्षण; पोलिसांकडून विशेष क्लास

Beed : चाईल्ड पोर्नोग्राफी, सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांनाच प्रशिक्षण; पोलिसांकडून विशेष क्लास

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना पोलीस

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना पोलीस

लाॅकडाऊन काळात चाइल्ड पोर्नोग्राफीच्या प्रकरणात अल्पवयीन आरोपींची नावे समोर आली होती. जिल्ह्यात पोलीस विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे दिले जात आहेत.

    बीड, 10 ऑगस्ट : विविध गुन्ह्यांमध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकांचे प्रमाण वाढून बीड जिल्हा वाईट गोष्टीसाठी चर्चेत आला होता. जिल्ह्यात लाॅकडाऊन (Lockdown) काळात चाइल्ड पोर्नोग्राफीच्या प्रकरणात अल्पवयीन आरोपींची नावे समोर आली होती. यामुळे जिल्ह्यात पोलीस विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Azadi Ka Amrit Mahotsav) विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे (Education of law) दिले जात आहेत. 75 शाळा आणि महाविद्यालयात हा उपक्रम राबवला जाणार आहे. देशभरात स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त सरकार दरबारी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. बीड जिल्ह्यात सायबर आणि चाईल्ड पोर्नोग्राफी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये मागील काही दिवसात वाढ दिसून आली. याचीच गंभीरता लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या सूचनेनुसार शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे, पोलीस दलातील विविध शस्त्रास्त्र आणि कामकाजाबद्दल माहिती दिली जात आहे. लॉकडाऊन दरम्यान शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. यात विद्यार्थ्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले. याचाच फायदा घेत मुलांना शिकार बनवले. मुलांना तेवढी समज नसल्याने नको त्या लिंक, शेअर, फॉरवर्ड झाल्याची प्रकरणे समोर येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीबाबत माहिती व्हावी याचसाठी पोलीस विभाग शाळा महाविद्यालयात जात विद्यार्थांना माहिती देत आहे. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO मुलींना हेल्पलाइनची माहिती शाळा, महाविद्यालयातील मुलींची छेडछाड होते. मुलींना मदत मिळावी यासाठी पोलिसांच्या हेल्पलाइनची माहिती दिली जात आहे. कुठे छेडछाड होत असेल, तर तक्रार कशी करावी याबाबत माहिती दिली आहे. मिलिया गर्ल्स हायस्कूल, यशवंत विद्यालय, पद्मश्री माध्यमिक विद्यालय, नजर जहा उर्दू कन्या शाळा. या शाळेत आतापर्यंत पोलिसांनी ही मोहीम राबवली असून 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. प्रामुख्याने महिला सक्षमीकरण बालकासंबंधी अपराध, काळजी व संरक्षण कायदेशीर तरतूद, राष्ट्रीय एकात्मता या विषयावर पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत. हेही वाचा- उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी  कायद्याविषयी जनजागृती भारताच्या 75 व्या अमृत महोत्सवांच्या निमित्याने बीड जिल्हा पोलीस दलाने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत जिल्ह्यातील सत्तरहून अधिक शाळा व महाविद्यालयांमध्ये कायद्याविषयी जनजागृती यामध्ये प्रामुख्याने महिला यांच्या सुरक्षे संबंधी कायद्याची माहिती देण्याचे काम बीड जिल्हा पोलीस दल करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली.
    First published:

    Tags: Beed, Beed news, School

    पुढील बातम्या