मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : दबंगगिरी वाढली, पोलिसही हतबल; 6 महिन्यात 31 सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले, VIDEO

Beed : दबंगगिरी वाढली, पोलिसही हतबल; 6 महिन्यात 31 सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले, VIDEO

पोलिसांसह शासकीय अधिकाऱ्यांवर दबंगगिरी करण्याच्या या वृत्तीमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल होत आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने अशी दबंगगिरी केली जात असल्याची चर्चा कर्मचारी वर्गात आहे. याला पोलीस प्रशासनही बळी पडते.

    बीड, 11 ऑगस्ट : जिल्ह्यात दबंगगिरीने प्रशासकीय यंत्रणा तणावाखाली काम करीत असल्याचे चित्र आहे. अशा गुन्हेगारी (Crime) वृत्तीच्या दबंगगिरीने शासकीय कामकाजात अडथळा आणून प्रसंगी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या गेल्या 6 महिन्यात 31 घटना घडल्या आहेत. पोलिसांसह शासकीय अधिकाऱ्यांवर (Government employees) दबंगगिरी करण्याच्या या वृत्तीमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल होत आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने अशी दबंगगिरी केली जात असल्याची चर्चा कर्मचारी वर्गात आहे. याला पोलीस प्रशासनही बळी पडते. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची हाच खरा प्रश्न पडला आहे. तुम्हा आम्हाला संरक्षण देणारे पोलीस कर्मचारी देखील बीड जिल्ह्यात सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे. दसरा, दिवाळी यासह अनेक धार्मिक महोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. यात कुठलीही बाधा येऊ नये यासाठी दिवस-रात्र पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावतात. मात्र, मागील सहा महिन्यात 11 पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO बीड जिल्हा नेहमीच कुठल्या ना कुठल्या विषयात चर्चेत असतो. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जिल्ह्यातील 31 शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. दर 6 दिवसाला 1 कर्मचाऱ्यांवर हल्ला होत असल्याचे भीषण वास्तव आहे. त्यामुळे जिल्हा पुन्हा शासकीय नोकरदारांसाठी असुरक्षित बनल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. 11 हल्ले हे पोलिसांवर झाले असून महसूल व महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी 5 तर नगर विकास व एसटी महामंडळाच्या प्रत्येक 2  व आरोग्य विभाग व न्यायालय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हा कारागृह बँक व कृषी विभागाची संबंधित प्रत्येकी 1 गुन्हा नोंद झाला आहे. सर्वाधिक हल्ल्याचे प्रमाण पोलीस कर्मचाऱ्यांवर विशेष म्हणजे सर्वाधिक हल्ल्याचे प्रमाण हे पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांवर वाढल्याचं समोर आले आहे. यामुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद पाहायला मिळतो. यांच्याकडून देखील पोलीस कर्मचाऱ्यांसह महसूल कर्मचाऱ्यांना काही वेळा अर्वाच्य भाषेत बोलले जाते. अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य निर्भीडपणे व चोखपणे बजावता यावे याकरिता सुरक्षित वातावरण तयार करण्याची जबाबदारी येथील राजकीय नेत्यांची, नागरिकांची आहे. हल्ले का वाढतात शासकीय कामात व कर्मचाऱ्यांवर राजकीय पुढाऱ्यांकडून दबाव आणला जातो व यातूनच तयार झालेल्या रोषामुळे अधिकारी किंवा कर्मचारी या हल्ल्याला सामोरे जात आहेत. जिल्ह्यात चालू वर्षातील सहा महिन्यात 31 गुन्ह्यांची नोंद झाली असून सर्वाधिक हल्ले हे जानेवारी महिन्यात झाले आहेत. तर फेब्रुवारी 6, मार्चमध्ये 5, एप्रिलमध्ये 6, व मेमध्ये 6, तर जूनमध्ये 1 गुन्ह्याची नोंद आहे. हेही वाचा- उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी  हल्ला करणाऱ्या आरोपींना कायद्याबद्दल अज्ञान  शासकीय नोकरदाराला मारहाण दमदाटी करणे हा अजामीन पात्र गुन्हा असून सहा महिन्यातच या गुन्ह्यांची सुनावणी सत्र न्यायालयात होऊन आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देखील होते. कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना कायद्याबद्दल अज्ञान असते, तसेच कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त अपेक्षा आणि त्या अपेक्षा पूर्ण न केल्याच्या गैरसमजातून कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात, असे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सांगितले. ही खूप निंदनीय गोष्ट आहे की जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसावरचं हल्ले होत आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज असून या आरोपींना कठोर शासन करण्याची  गरज असल्याचे पोलीस बॉईज संघटनाचे राहुल दुबाले यांनी सांगितले.
    First published:

    Tags: Beed, Beed news, Crime

    पुढील बातम्या