Home /News /maharashtra /

Beed : धरण उशाला आणि कोरड घशाला, ऐन पावसाळ्यात बीडकर तहानलेलेच, पाहा VIDEO

Beed : धरण उशाला आणि कोरड घशाला, ऐन पावसाळ्यात बीडकर तहानलेलेच, पाहा VIDEO

title=

बीड शहराला नियमित पाणी पुरवठा करता यावा यासाठी बीड नगर परिषदेकडून अमृत अटल योजनेचे (Amrut Water Supply Scheme) काम हाती घेतले. 14 कोटी खर्चाची ही योजना आहे.

    बीड, 03 ऑगस्ट : शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम कार्यारंभ आदेशानुसार तीन वर्षात पूर्ण करायचे होते. मात्र चार वर्षाचा कालावधी होऊनही काम अपूर्णच आहे. बीड शहराला नियमित पाणी पुरवठा करता यावा यासाठी बीड नगर परिषदेकडून अमृत अटल योजनेचे (Amrut Water Supply Scheme) काम हाती घेतले. 14 कोटी खर्चाची ही योजना आहे. मात्र, अद्याप या योजनेचे पाणी नागरिकांना मिळालेले नाही. सध्या 10 ते 15 दिवसाला नागरिकांना पाणी मिळत आहे. कामाच्या दिरंगाईमुळे भर पावसाळ्यात बीडकर तहानलेले आहेत. देशात 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. असे असताना बीडमध्ये मात्र पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावाच लागत आहे. बीड शहराकरिता 114 कोटी 63 लाख रुपयांची अमृत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. 2017 रोजी या योजनेची सुरुवात झाली आहे. २०२० पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु चार वर्ष होऊन देखील योजनेचे काम पूर्ण झालेले नाही, नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे ही योजना अद्यापही पूर्ण झाली नसल्याचे नागरिकात चर्चा आहे. परिणामी भर पावसाळ्यात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हेही वाचा- लहानपणी वाचा गेली पण जिद्द नाही; ग्रामीण भागातील मुक्या कलावंताची 'बोलकी' चित्रं बीड शहराला माजलगाव आणि बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी अमृत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची मुदत संपली असली तरी अद्याप काम पूर्ण झालेलं नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी 15 ते 20 दिवसांची वाट पहावी लागत आहे. शहरातील काही भागात तर 15 ते 20 दिवस पाणी येत नाही. येणारे पाणी दूषित आहे. यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आल्याचे स्थानिक नागरिक सुमनबाई शेवाळे यांनी सांगितले. शहराला दररोज लागते एवढे पाणी... बीड शहराला दररोज 34 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात 28 एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. अमृत योजना कार्यान्वित झाली तर 49 एमएलडी पाणी बीड शहराला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हेही वाचा- खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग झालेले आहे. मात्र, दिलेल्या वेळेत काम पूर्ण झालेलं नाही. नगरपालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला वेळोवेळी सहकार्य करत आहे. या योजनेचे काम लवकरात लवकर करावे. जेणेकरून बीड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असे नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश ढाकणे यांनी सांगितले. डिसेंबर अखेरीस हे काम पूर्ण होईल अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम 2017 मध्ये सुरू झाले. दरम्यान कोरोनाच्या काळामध्ये कामाला स्थगिती मिळाली होती. नगरपरिषदेकडून टाकीच्या जागा मिळण्यास उशीर झाला. सध्या पूर्ण क्षमतेने काम चालू असून डिसेंबर अखेरीस हे काम पूर्ण होईल, असे आश्वासन जीवन प्राधिकरण उपअभियंता मधुकर वाघ यांनी दिले.
    First published:

    Tags: Beed, Beed news, Drink water

    पुढील बातम्या