बीड, 1 एप्रिल, सुरेश जाधव : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऊसतोड मजूर महिलेवर मुकादमानेच अत्याचार केल्याची घटना घडली असून, या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ऊसतोड मजूर महिलेला ऊसतोडणीची उचल देतो असे सांगून आरोपीने तिला लाॅजवर बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी मुकादमाविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंजा रतन वाघमारे अस आरोपीचं नावं आहे.
पीडितेनं केली होती उचल देण्याची मागणी
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडितेनं मुकदामाला फोन करत पुढच्या वर्षासाठी ऊसतोडणीची उचल म्हणून पैसे देण्याची मागणी केली होती. यावर मुंजा वाघमारे याने तिला वडवणीला ये, असा निरोप दिला. वडवणीत आल्यावर कॉल केल्यानंतर त्याने एका लॉजचा पत्ता दिला. यावेळी तिच्याच गावातील एक व्यक्ती या लॉजच्या खाली उभी होती. त्याने पीडितेच्या चार वर्षांच्या मुलीला स्वत:जवळ ठेवत, मुकादमाकडून पैसे घेऊन खाली आल्यावर मुलीला घेऊन जा, असं सांगितलं.
दारुड्या बापाने शिवीगाळ केली, 22 वर्षीय तरुणीला राग झाला अनावर, घेतला भयानक निर्णय
गुन्हा दाखल
पीडिता पैसे आणण्यासाठी लॉजवर गेली असता दुसऱ्या मजल्यावर थांबलेल्या मुंजा वाघमारे याने तिच्यावर अत्याचार केला, तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेने कशी तरी आपली सुटका करत घर गाठले. पतीसह नातेवाइकांना हा प्रकार सांगितल्यावर रात्री वडवणी पोलीस ठाणे गाठले. मुंजा वाघमारे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Crime, Crime news