मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : महामार्ग बनले मृत्यूचा सापळा, 'या' कारणांमुळे वर्षभरात 462 जणांचा मृत्यू, Video

Beed : महामार्ग बनले मृत्यूचा सापळा, 'या' कारणांमुळे वर्षभरात 462 जणांचा मृत्यू, Video

X
Road

Road accidents increased beed

जिल्ह्यात वर्षभरात 734 जणांचा रस्त्यावर अपघात झाला असून यात 462 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 24 जानेवारी : शासनाकडून रस्ते अपघात कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र तरी देखील रस्ते अपघाताची संख्या कमी होताना दिसत नाही. बीड  जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 734 जणांचा रस्त्यावर अपघात झाला असून यात 462 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

ग्रामीण भागात वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. जवळपास 90 टक्के दुचाकीचालक हेल्मेट घालत नाहीत. वेगाने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे. चारचाकी वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींची वाहतूक करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, नशेत वाहन चालवणे, सीटबेल्ट न वापरणे, वेगमर्यादा न पाळणे अशा कारणामुळे अपघात होत आहेत.

जिल्ह्यात 734 अपघात

बीड जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांपासून राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेले आहे. यामुळे वाहने सुसाट धावू लागली आहेत. मात्र सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचा अपघात झाल्याच्या घटना देखील समोर येत आहेत.

जिल्ह्यामध्ये मागील वर्षी 734 अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील 162 अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर, झाले आहेत. तर 331 अपघात हे राज्य महामार्गावर, तर 241 अपघात हे जिल्हा महामार्ग व इतर मार्गावर झाले आहेत. या अपघातामध्ये 462 जणांचा मृत्यू झालाय, तर किरकोळ जखमींची संख्या 58 एवढी आहे. यापैकी मृत पुरुष 404 आहेत. तर मृत महिला 58 आहेत.

Video : बीडमध्ये वर्षभरात 350 लहान मुलांचा मृत्यू, पाहा काय आहेत कारणं

अपघाताची कारणं

राष्ट्रीय व राज्य महामार्गावर, अतिवेग धोकादायक आहे. ओव्हरटेक, मध्यपान करून वाहन चालवणे, सीटबेल्टचा वापर न करणे, वाहनांच्या नियमाविषयी अपुरी माहिती, रस्त्यावर वाहने उभी करणे, टायर फुटणे अशा कारणांमुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे.

वाहनांच्या नियमाचे सर्वांनी पालन करायला हवे जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडणार नाही व राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर दिलेल्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे व सोबतच वेगमर्यादा देखील राखणे महत्त्वाचे असल्याचे आरटीओ, स्वप्निल माने यांनी सांगितले.

First published:

Tags: Accident, Beed, Local18