बीड, 26 जानेवारी : मुलं जन्माला येताच काही आजार किंवा त्याला काही समस्या असू शकतात. टंग टाय ही एक समस्या अनेक मुलांमध्ये आढळते. जीभ जड होणे, जिभेची अधिक हालचाल न होणे, जीभ बाहेर काढता न येण्याचा त्रास मुलांना होतो. काही मुलांचे शब्द उच्चारण स्पष्ट होत नाही. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अशा 322 मुलांची टंग टाय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
राज्याचा आरोग्य विभागामार्फत आरोग्य संदर्भातल्या विविध योजना राबविल्या जातात. रोगराईचे प्रमाण कमी व्हावे, रुग्णांना वेळीच उपचार मिळावे, सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या योजनेचे माहिती करून दिली जाते. बीड जिल्ह्यात आरबीएसके कार्यक्रमाअंतर्गत अशाच काही शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत आणि हा कार्यक्रम लाभदायक देखील ठरतोय.
आरबीएसके या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयामध्ये जाऊन मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. यासाठी डॉक्टर, परिचारिका अधिपथके आहेत. तपासणीतून गेल्या वर्षी 350 बोबडं बोलणारी रुग्ण आढळून आली असून यामधील जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालयात 322 मुलांवर टंग टाय शस्त्रक्रिया पार पडली असून आता ती मूल स्पष्ट बोलता आहेत.
Video : बीडमध्ये वर्षभरात 350 लहान मुलांचा मृत्यू, पाहा काय आहेत कारणं
टंग टाय शस्त्रक्रिया म्हणजे काय?
एखाद्या मुलाचा जिभेचा शेंडा एका पडद्याने खालील जबड्याच्या आतील बाजू चिकटला असल्यास ठरावीक शब्द स्पष्ट उच्चारण येत नाहीत. त्याला जीप चिकटणे किंवा टंग टाय असे म्हणतात. यावर शस्त्रक्रिया करणे हा पर्याय असून शासकीय रुग्णालयात याची मोफत शस्त्रक्रिया केली जाते.
कॅन्सरवरील औषधं कार्यक्षम करण्याचा कोल्हापूरच्या शास्त्रज्ञांनी शोधला फॉर्म्युला
कधी करावी लागते शस्त्रक्रिया?
मुलाची तपासणी केली असता जीभ खालील दाताच्या बाहेर येत नसेल किंवा त्याला काही खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी अडचण येत असतील, तसेच शब्दोउच्चार व्यवस्थित किंवा स्पष्ट करता येत नसतील, अशा वेळी टंग टाय शस्त्रक्रिया करावी.
टंग टाय ही शस्त्रक्रिया करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, तसेच वैद्यकीय महाविद्यालय, इ एन टी, सर्जन उपस्थित असतात. त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करता येते. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामध्ये संपर्क साधता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.