बीड 24 ऑक्टोबर : एकीकडे राज्यात दिवाळीचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे बीडमधून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. बीडच्या अंबाजोगाईत 28 वर्षीय लाईनमन असणाऱ्या कर्मचाऱ्यावर काळानं घाला घातला आहे. अंबाजोगाई शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढलेल्या या तरुण कर्मचाऱ्याला विद्युत वाहक तारेचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरची 'लक्ष्मी' सोडून गेली, पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृ्त्यू
मेघराज व्यंकटी चाटे वय 28 रा. वरवटी ता. अंबाजोगाई असं मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय परिसरात क्रांतीनगर फिडरमध्ये बिघाड झाला होता. दुरुस्तीसाठी मेघराज चाटे हा तरुण लाईनमन विद्युत खांबावर चढला होता. त्यापूर्वी बंद केलेला विद्युत पुरवठा अचानक सुरु झाल्याने मेघराज याला विजेचा जोरदार झटका बसला अशी माहिती सूत्रांनी दिली.
त्यानंतर विद्युत पुरवठा खंडित करून मेघराज याला खाली उतरवून तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून मेघराज याला मयत घोषित केलं. मयत मेघराज चाटे याचं लग्न दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं. त्यामुळं त्याची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी होती. मात्र या घडलेल्या दुर्दैवी घटनेनं चाटे कुटुंबीयांसह वरवटी गावावर ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे.
दिवाळी साजरी करताना कोरोनाला करू नका दुर्लक्ष; कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी दिला इशारा
औरंगाबादमध्येही दिवाळीदिवशी दुर्घटना -
औरंगाबाद शहरात दिवाळीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. खरेदी करून घरी जात असताना भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला तर पती जखमी झाला आहे. या घटनेमुळे ऐन दिवाळी सणाच्या वेळी लाखेगाव गावावर शोककळा पसरली आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali, Shocking news